वाघांच्या संरक्षणाला महिला फौज, शिकाऱ्यांसाठी कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 08:05 AM2020-10-19T08:05:48+5:302020-10-19T08:08:02+5:30

शिकारी कधी व कुठून लक्ष्य साधतील सांगता येत नाही. पण या फासात त्यांनाच अडकवण्यात तरुणींची ही फौज प्रवीण आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत.

Women's army for tiger protection, Kardankal for hunters | वाघांच्या संरक्षणाला महिला फौज, शिकाऱ्यांसाठी कर्दनकाळ

वाघांच्या संरक्षणाला महिला फौज, शिकाऱ्यांसाठी कर्दनकाळ

Next


सविता देव हरकरे

नागपूर : महिलांनी सर्वच क्षेत्रात शिखरे पादांक्रांत केली आहेत. अशात वनविभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) वनवाघिणींनीवाघांच्या संरक्षणाचा विडा उचलून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. घनदाट जंगलात हिंस्त्र श्वापदांच्या सानिध्यात निडरपणे, जीव धोक्यात घालत त्यांची वाटचाल सुरू आहे. एकाच ध्येयाच्या दिशेने... देशाची वनसंपत्ती आणि वाघांचे रक्षण. 

शिकारी कधी व कुठून लक्ष्य साधतील सांगता येत नाही. पण या फासात त्यांनाच अडकवण्यात तरुणींची ही फौज प्रवीण आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत. प्राजक्ता उमरे, वर्षा जगताप, कांचन गजभिये, साधना निकुरे, प्रणिता आणि त्यांच्या सहकारी वने आणि वन्यजीवांवर वक्रदृष्टी टाकणाºया प्रवृत्तींविरुद्ध संपूर्ण ताकदीने लढा देत आहेत.

पहाटे ३ वाजल्यापासून गस्त
नवेगाव नागझिरा एसटीपीएफच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नांगरे सांगतात, पहाटे तीन वाजतापासून ‘शिफ्ट’ असतात. ८ तास १० ते १५ किमीचा पल्ला पायी गाठायचा असतो. गस्तीदरम्यान प्रत्येक क्षण सतर्क राहून अवैध घटनांचा मागोवा घेणे, वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत त्यांच्या नोंदी करणे. बाह्य सीमेवर गस्त घालताना जंगलालगतच्या गावात पोलीस पाटलाची भेट घेणे, लोकांशी संवाद साधून वने व वन्यजीवांचे महत्त्व पटवून देणे, आठवडी बाजारात गुप्त तपास करणे अशी अत्यंत महत्त्वाची कामे हे पथक पार पाडत असते. आज ३३ टक्के आरक्षण असताना एसटीपीएफमध्ये त्यांची संख्या ५० टक्क्यांवर पोहोचली आहे.

४ विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनवाघिणी
महाराष्टÑात ४ विशेष व्याघ्र संरक्षण दल आहेत. प्रत्येक दलात किमान २६ वनरक्षक व ७ वननिरीक्षक महिला आहेत. सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी या महत्त्वाच्या जबाबदाºयाही त्या पार पाडत आहेत.

विशेष मोहिमांमध्ये सक्रिय 
व्याघ्र संरक्षण दलांनी स्थापनेपासून आजवर अनेक विशेष मोहिमा यशस्वी केल्या. त्यात महिलांचा वाटा महत्त्वाचा ठरला. पेंचमधील मासेमारीचा प्रश्न, ताडोबातील मानव-वन्यजीव संघर्षविरोधी मोहीम, बचाव पथके, विजेद्वारे वन्यजीवांच्या शिकारीविरोधातील कारवाईत या वनवाघिणी आघाडीवर असतात.

कठोर प्रशिक्षण
विशेष व्याघ्र संरक्षण दलात सहभागी होताना अनेक अवघड चाचण्यांना सामोरे जावे लागते. निवडीनंतरही सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण असते. अनुशासन, संघटन, शारीरिक क्षमता सिद्ध करण्यास व्यायामाशिवाय वेपन ट्रेनिंग, साइट सिक्युरिटी टायगर मॉनिटरिंग, असे अनेक टप्पे असतात. 

समाजातील दुष्प्रवृत्ती, प्रथा यांच्याशी लढा देऊन अनेक महिला पुढे जात आहेत. यशस्वी होत आहेत. अशा महिलांची ही खास मालिका... तुमच्याही आसपास अशा महिला असतील तर त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. त्यातील काही निवडक महिलांचा लढा आम्ही प्रसिद्ध करू. 
माहिती पाठवण्यासाठी इमेल : ु१ंल्लस्रिं१३ल्ली१@’ङ्म‘ें३.ूङ्मे

Web Title: Women's army for tiger protection, Kardankal for hunters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.