मुंबई विद्यापीठाने पटकाविले राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद 

By appasaheb.patil | Published: December 30, 2019 05:02 PM2019-12-30T17:02:34+5:302019-12-30T17:06:07+5:30

पारितोषिक वितरणाने झाला स्पर्धेचा समारोप; सर्वसाधारण उपविजेतेपद १७० गुणांसह शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला

The winner of the state-level sports festival was won by the University of Mumbai | मुंबई विद्यापीठाने पटकाविले राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद 

मुंबई विद्यापीठाने पटकाविले राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद 

Next
ठळक मुद्देमुलांचे सर्वसाधारण विजेतेपद ११० गुणांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या संघाने पटकाविलामुलींचे सर्वसाधारण विजेतेपद १६० गुणांसह मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या संघाने पटकाविलेबास्केटबॉल मुलांचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, बास्केटबॉल मुलींचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सोलापूर :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आयोजित २३ वी राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद २५० गुणांसह मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या संघाने पटकाविले. तर सर्वसाधारण उपविजेतेपद १७० गुणांसह शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले. सोमवारी पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमास कुलपती नियुक्त निरीक्षण समितीचे समन्वयक डॉ. दीपक माने, वित्त समितीचे समन्वयक डॉ.  गोविंद कतलाकुटे, प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, तज्ज्ञ संचालक डॉ. प्रदीप देशमुख, आंतरराष्ट्रीय हँडबाल खेळाडू श्रेयस मालप, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक व स्वागत क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार यांनी केले.

या क्रीडा महोत्सवातील मुलांचे सर्वसाधारण विजेतेपद ११० गुणांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या संघाने पटकाविला. तर उपविजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले. मुलींचे सर्वसाधारण विजेतेपद १६० गुणांसह मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या संघाने पटकाविले. तर उपविजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले.  त्याचबरोबर बास्केटबॉल मुलांचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, बास्केटबॉल मुलींचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कबड्डी मुलांचे विजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने तर मुलींचे विजेतेपद एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबईने पटकाविले. खो खो मुलांचे विजेतेपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व मुलींचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले. व्हॉलीबॉल मुलांचे विजेतेपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व मुलींचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले आहे.

हँडबाल मुले व मुलींचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाले आहे. अ‍ॅथेलेटिक्स मुलांचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास तर मुलींचे विजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले आहे. यावेळी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून खेळांत उत्कृष्ट करियर करण्याचे आवाहन केले. 

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी एकही क्रीडांगण नसताना १५ क्रीडांगणे तयार करून आज महोत्सव यशस्वी झाल्याने आनंद व्यक्त केला. काहींनी महोत्सव यशस्वी होणार नसल्याची भीती व्यक्त केली होती, मात्र आमच्या टीममुळे महोत्सव चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहे, याचा खूप आनंद आहे. या कार्यक्रमात क्रीडा महोत्सवासाठी देणगी दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन स्वेता मालप तर आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.

Web Title: The winner of the state-level sports festival was won by the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.