एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, आदित्य येणार? फडणवीस तेव्हाही आलेले

By हेमंत बावकर | Published: June 30, 2022 05:47 PM2022-06-30T17:47:29+5:302022-06-30T17:49:52+5:30

Eknath Shinde As new CM: ज्या उद्धव ठाकरेंच्या संयमी, विनयशील नेतृत्वाची कालपासून चर्चा आहे, ते पाहता उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहायला हवे, असे अनेकांना वाटत आहे. उद्धव ठाकरे असे करतील का? 

Will Uddhav Thackeray and Aditya attend Eknath Shinde's swearing in ceremony? devendra Fadnavis also came when MVA OAth | एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, आदित्य येणार? फडणवीस तेव्हाही आलेले

एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, आदित्य येणार? फडणवीस तेव्हाही आलेले

googlenewsNext

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आपण नाही तर एकनाथ शिंदेमुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आणि अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या अडीच वर्षांपासून याचसाठी त्यांचा अट्टाहास होता का? असाही प्रश्न अनेकांना पडला. पण जे घडले ते आपण साऱ्यांनीच पाहिले, ऐकले. आता आणखी एक ट्विस्ट महाराष्ट्राला पहायला मिळण्याची शक्यता आहे. 
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी जंग जंग पछाडलेले. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने निकाल लागताच आम्हाला मुख्यमंत्री पद देण्याचा भाजपाने शब्द दिलेला याचे भांडवल करून मविआसोबत सत्ता स्थापन केली. त्यापूर्वी फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येत पहाटेलाच शपथविधी पार पाडला. शरद पवारांनी पक्ष सावरत अजितदादांसह साऱ्या आमदारांना परत आणले आणि मविआ सरकारमध्ये उभे केले. 

जेव्हा मविआ सरकारचा शपथविधी होता, तेव्हा दुसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची हळदही न उतरलेले परंतू मुख्यमंत्री पद गमावलेले फडणवीस खुल्या दिलाने या ठाकरेंच्या या सोहळ्याला आले होते. खरे म्हणजे आधीच्या मुख्यमंत्र्याने शपथविधीला येऊन कटुता संपविण्याची, नव्या सरकारला शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. फडणवीसांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. परंतू आता प्रश्न उरतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत का? 

देवेंद्र फडणवीसांनी आजच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण कोणाला दिलेले नाहीय, असे स्पष्ट केलेले असले तरी महत्वाचे नेते, माजी मुख्यमंत्री आदींना शपथविधीला बोलविले जाते. यामुळे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शिंदेंच्या शपथविधीला जातील का, याचे उत्तर थोड्याच वेळात मिळेल. परंतू ज्या उद्धव ठाकरेंच्या संयमी, विनयशील नेतृत्वाची कालपासून चर्चा आहे, ते पाहता उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहायला हवे, असे अनेकांना वाटत आहे. उद्धव ठाकरे असे करतील का? 

त्या १४ आमदारांबाबत शिंदे काय म्हणाले... 

शिंदेंनी काही वेळापूर्वीच्या पत्रकार परिषदेत आपली ताकद किती याची आकडेवारी सांगितली, तेव्हा त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. 'आणखी किती येतील माहित नाही...' याचा अर्थ आता राजकीय लोक काढू लागले आहेत. शिंदेंचे हे वाक्य ठाकरेंसोबत राहिलेल्या १४ आमदारांबाबतचे आहे. यात आदित्य ठाकरे देखील आहेत. केसरकरांनी देखील काल आमचा व्हीप डावलला तर अपात्रतेची कारवाई करायची की नाही याचा निर्णय शिंदे घेतली असा इशारा दिला आहे. यामुळे शिंदे गटासोबत आता शिवसेनेच्या उर्वरित १४ आमदारांची फरफट होते की काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

Read in English

Web Title: Will Uddhav Thackeray and Aditya attend Eknath Shinde's swearing in ceremony? devendra Fadnavis also came when MVA OAth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.