गर्दी जमवण्यासाठी बस खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 10:28 PM2022-10-04T22:28:44+5:302022-10-04T22:29:20+5:30

Supriya Sule : सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. भरतगाव येथे एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Where did the amount of 10 crores for the bus cost to gather the crowd come from? Supriya Sule's question to the Chief Minister | गर्दी जमवण्यासाठी बस खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

गर्दी जमवण्यासाठी बस खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

googlenewsNext

पुणे : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून राज्यभरातून बस भरुन कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे ही गर्दी जमवण्यासाठी येणाऱ्या बस खर्चाची दहा कोटींची रक्कम आली कुठून? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. सगळे व्यवहार ऑनलाईन सुरु असताना ही एवढी मोठी रक्कम रोकड बघायला मिळते, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्याची तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. भरतगाव येथे एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "विश्वास महत्त्वाचा असतो, त्याला तडा जाता कामा नये. मला तर चिंता वाटत असून दौंड मधूनच मोदी साहेबांना फोन लावावा आणि ही 10 कोटीची रोकड कुठून आली अशी विचारणा करावी असे वाटत आहे. याची चौकशी लावा असे सांगावं तर ते म्हणतील, आम्ही हे दहा कोटी रोकड राज्यातून जमा केली."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील निवडणुकीच्या काळात 'ये तो चुनावी जुमला है' असे म्हणाले होते. म्हणजेच आपल्या भाषेतील थाप मारली होती. पंधरा लाख रुपये आपल्या खात्यावर जमा होणार अशी त्यांनी घोषणा केली होती. त्यावर तर मी बोलणारच नाही. आपल्याला दोन मते कमी मिळाले तरी चालतील पण लोकांना फसवून मते घ्यायचे नाहीत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना लगावला आहे. 

याचबरोबर, सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, " राज्यात आलेल्या नवीन सरकारने निधी थांबवला आहे. ते पैसे तुमचे आहेत. तुम्ही कर भरता म्हणून सरकार चालते. तसेच, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेत मिळत नाहीत. लहान मुलांच्या दुपारच्या जेवणाचे पैशाला कट मारला आहे. त्यांच्या जेवणातील भात, भाज्या राज्य सरकारने कमी केले आहे. एकीकडे आपल्या काही योजना कमी करत आहेत आणि इकडे दहा कोटी रुपये रोकड भरत आहेत. मला तर वाटते आपण लाटणे घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढायला हवा पण मंत्रालयात मंत्री जागेवर नसतात."

Web Title: Where did the amount of 10 crores for the bus cost to gather the crowd come from? Supriya Sule's question to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.