मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:14 PM2019-12-18T17:14:48+5:302019-12-18T17:15:12+5:30

ज्या आरक्षणासाठी भाजप नेते आपली पाठ थोपटून घेत होते, त्या आरक्षणासाठी मराठा समाजातील 46 जणांनी मृत्यूला कवटाळले. त्यामुळं तुम्हाला आरक्षण देणे भाग पडले. पण भाजपला आरक्षण खरच द्यायच होत का, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.

We will take care of the families of the martyrs of the Maratha reservation: Dhananjay Munde | मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे

मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे

Next

नागपूर -  मराठा आरक्षण देण्याचे क्रेडीट भाजपकडून घेण्यात येते. या मुद्दावरून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत भाजपवर टीका केली. तसेच आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांच्या पाठिशी महाविकास आघाडीचे सरकार उभे राहिल, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. 

मराठा समाजाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे सभागृहात अभिनंदन केले होते. मात्र मराठा समाजाला खरं आरक्षण पंढरपूरच्या विठ्ठलाने दिल्याचा दावा मुंडे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाने पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पुजेपासून रोखले होते. वारीच्य़ा काळात त्यांना पुजेला जाता आले नव्हते. त्यामुळे हे आरक्षण मिळाले. 

ज्या आरक्षणासाठी भाजप नेते आपली पाठ थोपटून घेत होते, त्या आरक्षणासाठी मराठा समाजातील 46 जणांनी मृत्यूला कवटाळले. त्यामुळं तुम्हाला आरक्षण देणे भाग पडले. पण भाजपला आरक्षण खरच द्यायच होत का, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. आरक्षण मिळालं ते चांगलच आहे. पण आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या 46 लोकांच्या कुटुंबाकडे आम्ही पाहणार, असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी मुंडे यांनी धनगर आरक्षणावरून देखील विरोधकांवर टीका केली. 
 

Web Title: We will take care of the families of the martyrs of the Maratha reservation: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.