150 वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे मुंबईचे वॅटसन हॉटेल

By अोंकार करंबेळकर | Published: August 26, 2017 12:25 PM2017-08-26T12:25:58+5:302017-08-26T12:48:57+5:30

भारतातील चलतचित्राची पहिली पावलं याच इमारतीत पडली, मार्क ट्वेन, महंमद अली जिना यांच्यासारख्या पाहुण्यांनी या इमारतीला भेट दिली आहे.

The Watson hotel of Mumbai, which has 150 years of history history | 150 वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे मुंबईचे वॅटसन हॉटेल

150 वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे मुंबईचे वॅटसन हॉटेल

googlenewsNext
ठळक मुद्देवॅटसन हॉटेल इमारतीच्या सांगाड्याच्या लोखंडाचे ओतकाम इंग्लंडमध्येच करण्यात आले होते.130 खोल्या, भोजनगृह, बार, बॉलरुम असा प्रशस्त विस्तार असणारे हॉटेल अनेक वर्षे दिमाखात चालले.

मुंबई, दि.26- मुंबईच्या काळा घोडा परिसरामधील असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंमुळे या परिसराला शहराचा हेरिटेज डिस्ट्रिक्ट असे संबोधले जाते. ब्रिटिशकालीन इमारती, क्नेसेट इलियाहू सिनेगॉग, डेव्हीड ससून लायब्ररी अशा चारही बाजूंनी इमारती या परिसराला आपल्याला काळाच्या दिड-दोन शतके मागे घेऊन जातात. यामध्येच एक महत्त्वाची वास्तू आहे ती म्हणजे वॅटसन हॉटेल. ओतीव लोखंडातून तयार केलेल्या इमारतींपैकी भारतातील ही सर्वात जुनी इमारत आहे. या जागेवर वॅटसन हॉटेल गेली दिडशे वर्षे उभे आहे.

वॅटसन हॉटेलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीच्या सांगाड्याच्या लोखंडाचे ओतकाम इंग्लंडमध्येच करण्यात आले होते. त्यानंतर ते भारतात आणून जोडण्यात आले. सुमारे 150 वर्षांपुर्वी असं काही करणं कल्पनातीत होतं. आजच्याच दिवशी 150 वर्षांपुर्वी म्हणजे 26 ऑगस्ट 1867 रोजी अब्दुल हक यांना 999 वर्षांसाठी 92 रुपये 12 आणे प्रतीवर्षी भाडेतत्त्वावर देण्यात आली. या हॉटेलचे मूळ मालक जॉन हडसन वॅटसन यांच्यामुळे या हॉटेलला वॅटसन्स एस्प्लांड हॉटेल असे म्हटले जाऊ लागले.

(दूरवर दिसणारे ताज हॉटेल... - सर्व छायाचित्रे- निर्माण चौधरी)

 इंग्लंडमध्ये कॅसल कॅरॉक येथे 1818 साली त्यांचा जन्म झाला. वॅटसननी कापडाच्या व्यवसायात भरभराट केल्यानंतर त्यांना त्यासाठी इमारतीचे बांधकाम करण्याची इच्छा होती. त्यानुसार इंग्लंडमध्ये ओतीव लोखंडाचे काम करुन इमारतीचे वेगवेगळे भाग बनविण्यास त्यांनी सुरुवात केली. 1865 ते 67 या दोन वर्षांमध्ये मुंबईत हे सुटे भाग आणून जोडण्यात आले आणि त्यामध्ये हॉटेल सुरु करण्यात आले. मुंबईतले किंबहुना भारतातील प्रतिष्ठित लोकांनी जायचे हॉटेल म्हणून या हॉटेलने अल्पावधीत प्रसिद्धी मिळवली. या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी वॅटसनने इंग्लंडमधूनच कर्मचारी आणले होते. प्रवाशांना उतरायला 130 खोल्या, भोजनगृह, बार, बॉलरुम असा प्रशस्त विस्तार असणारे हॉटेल अनेक वर्षे दिमाखात चालले. असं म्हटलं जातं की जमशेदजी टाटा यांना या हॉटेलात प्रवेश नाकारला गेला म्हणून त्यांनी स्वतःचं ताज महाल हॉटेल बांधायला घेतलं. मात्र याला कोणताही पुरावा मिळत नाही. अर्थात ताज हॉटेलची भरभराट आणि त्याला मिळणारी वाढती मागणी यामुळे वॅटसनला मोठी स्पर्धा मात्र निर्माण झाली. 1960 साली हॉटेल बंद पडून तेथे भाडेकरु राहायला लागले तर काहींनी कार्यालयं थाटली. हाकेच्या अंतरावर हायकोर्ट असल्यामुळे येथे अनेक वकिलांची कार्यालयं, टायपिंग करुन देणारी आणि त्यासंबंधीत कार्यालयं सुरु झाली. आज या इमारती अवस्था अत्यंत जीर्ण असून एकेकाळी ब्रिटिशांच्या वैभवाची साक्ष देणारं आणि सलग 150 वर्षांचा इतिहास अनुभवणारं हे हॉटेल अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.

कूपरेज बॅंडस्टॅंडवर पुन्हा ऐकू येणार धून, मुंबईकरांना अनुभवता येतील जुने दिवस

परळमध्ये गवसला ब्रिटिशकालीन मैलाचा दगड

वॅटसनचे ग्राहक 
प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत मार्क ट्वेन यांनी या हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. या इमारतीमध्ये राहात असताना त्यांनी मुंबईतील कावळ्यांचे निरिक्षण केले आणि त्यावर राऊंड इक्वेटर या आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवले आहे.
याच हॉटेलमध्ये फ्रेंच फिल्ममेकर ल्युमिएर बंधुंनी 7 जुलै 1896 रोजी काही चलतचित्राच्या फिल्म दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. चलतचित्र दाखवण्याची भारतातील ही पहिलीच वेळ होती. ल्युमिएर बंधुंच्या या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. भारतातल्या चलतचित्रपटाने म्हणजे सिनेमाची पहिली पावलं याच हॉटेलमध्ये पडली.  मोहम्मद अली जिनाही या हॉटेलमध्ये येत असत असे सांगितले जाते.

(150 वर्षांचा इतिहास पाहणारं हॉटेल आज दुकाने आणि कार्यालयांनी भरलंय. छाया-निर्माण चौधरी)

पक्ष्याचा पिंजरा आणि थेम्स नदीच्या विटा
वॅटसन हॉटेलचा लोखंडी सांगाडा पाहून सुरुवातीच्या काळात भारतीय लोकांनी पक्ष्याचा पिंजरा म्हणून या इमारतीला ओळखायला सुरुवात केली. बर्ड केज म्हणून याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. संपुर्ण सुटे भाग आधी तयार करुन नंतर जोडलेली ही आशिया खंडातील पहिली इमारत आहेत. लोखंडाचे सुटे भाग आणि त्यासाठी वापरलेल्या विटासुद्धा इंग्लंडमध्ये थेम्स नदीच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या आहेत.
 

 

Web Title: The Watson hotel of Mumbai, which has 150 years of history history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत