पहिल्यांदा छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळतेय : पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:03 PM2020-03-12T15:03:27+5:302020-03-12T15:12:10+5:30

मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे.

Wanjari community gets opportunity for Rajya Sabha with Chhatrapati said Pankaja Munde | पहिल्यांदा छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळतेय : पंकजा मुंडे

पहिल्यांदा छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळतेय : पंकजा मुंडे

googlenewsNext

मुंबई : या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. आता, भाजपाने तिसरे नाव सुद्धा जाहीर केले असून, त्यासाठी डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भागवत करडांच्या रूपाने पहिल्यांदा छत्रपतींच्यासोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्यात की, राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून भागवत कराड यांची निवड झाली असून, ते जनतेपर्यंत पोहचणारे नेते आहे. त्यामुळे त्यांच्या या निवडीबाबत आनंद आहे. तसेच पहिल्यांदाच छत्रपतींच्यासोबत वंजारी समाजाच्या नेत्याला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली असून, यातून एक चांगला संदेश जाणार असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या.

राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून एका नावाची घोषणा करणे बाकी होते. त्यासाठी, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा होती. एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपा नाथाभाऊंना दिल्लीत पाठवणार अशी चर्चा होती. मात्र, ना काकडे, ना खडसे असे म्हणत भाजपाने तिसराचा उमेदवार जाहीर केला आहे. मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले आहे.


 


 

Web Title: Wanjari community gets opportunity for Rajya Sabha with Chhatrapati said Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.