२४ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आता २० डिसेंबरला होईल मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:02 IST2025-12-02T08:51:51+5:302025-12-02T09:02:20+5:30

२३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या २४ नगरपालिका व नगरपंचायतींचे अध्यक्ष व सदस्यपदांसाठी येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Voting for 24 municipalities and municipal councils will now be held on December 20. | २४ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आता २० डिसेंबरला होईल मतदान

२४ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आता २० डिसेंबरला होईल मतदान

मुंबई : नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांसंदर्भात २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या २४ नगरपालिका व नगरपंचायतींचे अध्यक्ष व सदस्यपदांसाठी येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर इतर ७६ नगरपालिका, नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांसाठीही याचवेळी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.

दुसऱ्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. या सुधारित निवडणूक कार्यक्रमाची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी दिली.

१६ जिल्यांतील २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणूक

ठाणे : अंबरनाथ

अहिल्यानगर : कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा

पुणे: बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची

सोलापूर : अनगर, मंगळवेढा। सातारा : महाबळेश्वर, फलटण

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री

नांदेड : मुखेड, धर्माबाद

लातूर: निलंगा, रेणापूर

हिंगोली: बसमत

अमरावती: अंजनगाव सुर्जी

अकोला : बाळापूर

यवतमाळ : यवतमाळ

वाशिम : वाशिम

बुलढाणा : देऊळगावराजा

वर्धा : देवळी

चंद्रपूर : घुग्घूस

७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्य

अमरावती : अचलपूर २, दर्यापूर १ धारणी २, वरूड १

अहिल्यानगर : जामखेड २, राहुरी १, शिर्डी १, शेवगाव ३, श्रीगोंदा १, श्रीरामपूर १, संगमनेर ३

कोल्हापूर : गडहिंग्लज १

गडचिरोली : आरमोरी १, गडचिरोली ३

गोंदिया : गोंदिया ३, तिरोडा १

चंद्रपूर : गडचांदूर १, बल्लारपूर १, मूल १, वरोरा १

छत्रपती संभाजीनगर: गंगापूर २, पैठण ४, वैजापूर २

जळगाव : अंमळनेर १, पाचोरा २, भुसावळ ३, यावल १, वरणगाव २, सावदा ३

जालना : भोकरदन २

ठाणे : बदलापूर ६

धाराशिव : उमरगा ३, धाराशिव ३

नांदेड : कुंडलवाडी १, भोकर १, लोहा १

नागपूर : कामठी ३, कोंढाळी २, नरखेड ३, रामटेक १

नाशिक : ओझर २, चांदवड १, सिन्नर ४

परभणी : जिंतूर १, पुर्णा २

पालघर : पालघर १, वाडा १

पुणे : तळेगाव ६, दौंड १, लोणावळा २, सासवड १

बीड : अंबेजोगाई ४, किल्ले धारूर १, परळी ५

बुलढाणा : खामगाव ४, जळगाव जामोद ३, शेगाव २

भंडारा : भंडारा २

यवतमाळ : दिग्रस ३,

पांढरकवडा २, वणी १

रत्नागिरी: रत्नागिरी २

लातूर : उदगीर ३

वर्धा : पुलगाव २, वर्धा २, हिंगणघाट ३

वाशिम: रिसोड २

सांगली : शिराळा १

सातारा : कराड १, मलकापूर २

सोलापूर : पंढरपूर २, बार्शी १, मैंदर्गी १, मोहोळ २, सांगोला २

हिंगोली : हिंगोली २

Web Title : नगरपालिका चुनाव: 24 परिषदों, नगर पंचायतों के लिए 20 दिसंबर को मतदान।

Web Summary : 24 नगरपालिकाओं और नगर पंचायतों के लिए पुन: चुनाव, साथ ही 76 अन्य में 154 सीटों के लिए 20 दिसंबर को मतदान होगा। गिनती 21 दिसंबर को होगी। राज्य चुनाव आयोग ने ठाणे और सोलापुर सहित सोलह जिलों को प्रभावित करने वाले संशोधित चुनाव कार्यक्रम की घोषणा की।

Web Title : Municipal Elections: Voting on December 20 for 24 councils, nagarpanchayats.

Web Summary : Re-elections for 24 municipal councils and nagarpanchayats, plus 154 seats in 76 others, are scheduled for December 20. Counting will occur on December 21. The State Election Commission announced revised election program affecting sixteen districts, including Thane, and Solapur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.