Vote for LMOTY 2019: कोण आहे नाटकांमधील अभिनयसम्राट?; 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 06:42 PM2019-02-12T18:42:38+5:302019-02-12T18:44:00+5:30

अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

Vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for best male actor theatre category | Vote for LMOTY 2019: कोण आहे नाटकांमधील अभिनयसम्राट?; 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला? 

Vote for LMOTY 2019: कोण आहे नाटकांमधील अभिनयसम्राट?; 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला? 

Next

ज्यांच्या मनगटांत महाराष्ट्र आणि मुठीत विश्व अशा महारत्नांचा गौरव म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळा. यंदा २० फेब्रुवारीला मुंबईत हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. त्यातील रंगभूमी-पुरुष या गटासाठी पाच नामांकनं निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी तुमच्या आवडत्या कलाकाराला तुम्ही खालील बॉक्समध्ये मत देऊ शकतं.  

आस्ताद काळे (तिला काही सांगायचंय) 
'तिला काही सांगायचं आहे' हे नाटक आस्तादाचे सध्या रंगभूमीवर जोरदार सुरु आहे. यश पटवर्धन आणि मिताली सहस्रबुद्धे या जोडप्याची ही गोष्ट आहे. यश पटवर्धनची भूमिका आस्ताद काळेने साकारली आहे. यश एका कार्पोरेटमध्ये मोठया हुद्द्यावर आहे तर मिताली एका समाजिक संस्थेमध्ये काम करत असते. मितालीवर खूप प्रेम करणारा, थोडासा पारंपरिक विचारांचा, आपल्या बायकोची तिच्याच ऑफिसमधल्या एका कलीगशी जरा जास्तच असलेली जवळीक आणि त्यामुळे अस्वस्थ होणारा, त्यानंतर तिने एक स्फोटक खुलासा केल्यावर उद्धवस्त होणारा यश, आस्तादने अगदी समर्थपणे साकारला आहे. आजच्या तरुण पिढीला आपलीशी वाटणारी अशी या नाटकाची भाषा आणि संवाद आहेत. यातील आस्तादाने साकारलेला यश रसिक प्रेक्षकांना भावला आहे.
...........
भरत जाधव ( वन्स मोअर) 
भरतचे आणखीन एक नाटक रसिकांच्या भेटीला आले आहे ते म्हणजे 'वन्स मोअर'. या नाटकात भरतने जीवनची भूमिका रंगवली आहे. ही गोष्ट आहे जीवन देशमुख आणि नियती देशमुख यांच्या सुखी कुंटुंबाची. जीवन आणि नियती यांना एक लालू नावाचा शाळेत जाणारा मुलगा असतो. लालूसोबत खेळायला कोणीतरी आणायचं असा विचार जीवन करत असतानाच सरकार फतवा काढते की, या पुढे विवाहित जोडप्यास एकच मुल जन्माला घालता येईल. एक मुलाची गंभीर समस्या हसत-खेळत मांडण्यात आली आहे. त्यामुळे नाटक धमाल करुन जात असताना प्रेक्षकांना अंतमुर्ख व्हायला भाग पाडते. जीवनची मध्यवर्ती भूमिका भरतने समर्थपणे साकारली आहे. 
.............
मोहन जोशी (नटसम्राट) 
मोहन जोशी यांनी पुण्यातील थिएटरपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंगभूमी असो मालिका असो किंवा सिनेमा असो या तिनही माध्यमांमध्ये मोहन जोशी यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'नटसम्राट'च्या रुपात त्यांनी एक अजरामर नाट्यकृती रंगभूमीवर आणली. कुणी घर देता का घर? अशी साद देणाऱ्या आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा जीवंत केली. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या शोकांतिकांवरुन प्रेरित होऊन वि. वा. शिरवाडकर यांनी 'नटसम्राट' हे नाटक लिहिले होते. सत्तरच्या दशकात या नाटकाने रंगभूमीवर इतिहास रचला होता. या नाटकासाठी नाना पाटेकर यांनी मोहन जोशींची निवड केली आहे. रोहिणी हट्टंगटी यांनी यात मोहनी जोशी यांची पत्नी कावेरीची भूमिका साकारली आहे. ह्रषिकेश जोशी यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संभाळली आहे. 
.............
प्रशांत दामले (एका लग्नाची पुढची गोष्ट)
लग्नाच्या अनेक वर्षांनंतर पती-पत्नीचे नाते कशा पद्धतीने बदलत जाते, त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे नाते कसे बदलते हे सगळे हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडण्यात आलेले आहे. सहकाऱ्याच्या सांगण्यावरुन ऑफीसातल्या एका मुलीच्या प्रेमात पडणारा आणि त्यामुळे घरच्या बायकोला सांभाळण्याची त्रेधा तिरपीट सावरणारा मन्या प्रशांतने साकार केलाय 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या सध्या त्यांचे रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकात. कविता लाड आणि प्रशांत दामले यांच्या जोडीचे 'एका लग्नाची गोष्ट' हे नाटक चांगलेच लोकप्रिय ठरले होते. या नाटकात त्यांनी गायलेले 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं', हे गाणे आजही लोकप्रिय आहे. पुन्हा एकदा याच जोडीसोबत 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक रसिकांच्या भेटीला आले आहे. या नाटकात प्रशांत दामले यांनी मनोजची (मन्या) भूमिका साकारली आहे. 
.................
वैभव मांगले (अलबत्त्या गलबत्त्या)
'अलबत्या गलबत्या' हे सत्तरच्या दशकात गाजलेलं बालनाटय वैभव मांगले यांनी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येऊन आला आहे. यात वैभवने चेटकणीची भूमिका साकारली आहे. हे नाटक लहान मुलांच्या विश्वात डोकावणार आहे. एका राजाला त्याच्या मुलीचे लग्न करायचे असते, परंतु तिच्या कुंडलीत तिचे लग्न एका अलबत्या गलबत्या नामक व्यक्तीशी होणार असते. राजाला हे कदापि मान्य नसल्यामुळे तो त्याच्या मुलीला नजरकैदेत ठेवतो. राजा त्या अलबत्याला फाशी देण्याचे जाहीर करतो. तर दुसरीकडे चेटकिणीला सर्व जग तिच्या ताब्यात यावे अशी इच्छा असते. तिच्याकडे एक जादूची आगपेटी असते. ही आगपेटी ती चालाकीने अलबत्या गलबत्या म्हणजेच अलबतराव गलबतराव याच्या द्वारे मिळवते अशी काहीशी या नाटकाची गोष्ट आहे. रत्नाकर मतकरी लिखित चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित हे नाटक प्रेक्षकांची मने जिंकत आहे. वैभव मांगले यांनी आपल्या भूमिकेव्दारे बाल रसिकांची दाद मिळवली आहे. 

Web Title: Vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for best male actor theatre category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.