विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीने घेतली सांगली पुरग्रस्त भागातील पाच गावे दत्तक

By Appasaheb.patil | Published: August 16, 2019 12:19 PM2019-08-16T12:19:46+5:302019-08-16T12:41:34+5:30

पंढरपूर; २५ लाखाच्या निधीतून गावे पुर्नउभारणी करण्यात येणार

Vitthal-Rukmini Temple Committee adopts five villages in Sangli Puritad area | विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीने घेतली सांगली पुरग्रस्त भागातील पाच गावे दत्तक

विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीने घेतली सांगली पुरग्रस्त भागातील पाच गावे दत्तक

googlenewsNext
ठळक मुद्दे- पुरग्रस्तांसाठी पंढरपुरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीचे दातृत्व- पाच गावे घेतली दत्तक, पुर्नउभारणीचे काम करणार- सांगली जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्या पाच गावात सेवासुविधा पुरविणार

सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाºया पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीने सांगली पुरगस्त भागातील पाच गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळात जनतेला मदत करणाºया विठ्ठल मंदिर समितीने आता पुरग्रस्त भागात जोरदार मदतकार्य सुरू केले आहे़ सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, अंकली, तुंग, समडोळी, कसबे डिंग्रज ही गावे विठ्ठल मंदिर समितीने दत्तक घेतली आहेत़ या पाच गावांच्या पुर्नउभारणीसाठी मंदिर समिती २५ लाखांचा निधी देणार आहे.

विठ्ठल मंदिर समितीने सांगली प्रशासनास पाच गावे दत्तक घ्यावयाची आहेत त्यासाठी पाच गावांची नावे देण्यात यावी असे सुचविले होते़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने म्हैसाळ, अंकली, तुंग, समडोळी, कसबे डिंग्रज ही गावे सुचविली आहेत़ पुरामुळे सांगली जिल्ह्यातील अंकली गावातील ६५०, कसबे डिंग्रजमधील ३००, म्हैसाळमधील २५०, समडोळीमधील ५९ आणि तुंगमधील २५ कुटुंब स्थलांतरीत करण्यात आली होती़ या कुटुंबाचे पुर्नउभारणी करण्याबरोबरच आवश्यक त्या सेवासुविधा पोहचविण्यासाठी विठ्ठल मंदिर समिती पुढाकार घेणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. 


 

Web Title: Vitthal-Rukmini Temple Committee adopts five villages in Sangli Puritad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.