मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 10:08 AM2022-10-01T10:08:52+5:302022-10-01T10:09:53+5:30

ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार आहेत

Verbal dispute between CM Eknath Shinde and Shivsena MLA Pratap Sarnaik? | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे ठाण्यातील विश्वासू शिलेदार आमदार प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ओवळा माजिवाडा मतदारसंघावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. सरनाईक यांचा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. मात्र सरनाईक त्यास तयार नसल्याने हा वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. 

ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ भाजपाला सोडावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याला सरनाईकांनी विरोध केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि सरनाईक यांच्यात बेबनाव असल्याचं दिसून येते. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नगरविकास खात्याच्या एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असताना त्याठिकाणी सुरुवातीला प्रताप सरनाईक दिसत नव्हते. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सरनाईक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. 

सरनाईक यांच्यासोबत वादावर मुख्यमंत्री म्हणाले...
कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रताप सरनाईक आणि तुमच्यात खटके उडाल्याच्या चर्चा आहेत असा प्रश्न केला त्यावर शिंदे म्हणाले की, आम्ही तुमच्यासमोर आहोत. आम्ही काम करणारे लोक आहोत. आमचा फोकस राज्याला विकासाकडे नेण्याचा आहे. एखादे काम सुरू होतं वर्षानुवर्षे रेंगाळतं. त्यामुळे विकासासाठी आम्ही काम करत आहोत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य करणं टाळलं. 

दो दिल और एक जान है हम !! 
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या वादावर प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूर्वेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो पोस्ट करत !! दो दिल और एक जान है हम !! असं कॅप्शन दिले आहे. त्यामुळे शिंदे-सरनाईक वादावर हे प्रत्युत्तर असल्याचं म्हटलं जात आहे. 

असा आहे प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवास
राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झालेले प्रताप सरनाईक यांनी २००८ साली शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. लगेचच २००९ मध्ये प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील ओवळा-माजिवाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढत विजय मिळवत आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते २००९, २०१४ आणि २०१९ साली सलग तीनवेळा आमदार निवडून आले. या मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेसह मीरा- भाईंदर महानगरपालिकेचा देखील काही भाग येतो. ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाच्या विभागापासून ते थेट वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भाग याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवाडा याच मतदारसंघात येतात. येथे सरनाईक यांची मजबूत पकड आहे.
 

Web Title: Verbal dispute between CM Eknath Shinde and Shivsena MLA Pratap Sarnaik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.