Vasubaras today; The garb of the Vitthal Temple in Pandharpur is decorated with flowers | आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला 
आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला 

ठळक मुद्दे- आजपासून दिपावलीच्या सणास प्रारंभ- जिल्ह्यात सर्वत्र वसुबारस साजरा करण्यासाठी सोलापूरकर सज्ज- विठ्ठल मंदीर समितीच्या पुढाकाराने विठ्ठलाचा गाभारा फुलला

पंढरपूर : पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदीरातील विठ्ठलाच्या गाभाºयास आज वसुबारसनिमित्त खास फुलांची आरस करण्यात आली आहे.

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.

काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीच्यावतीने विठ्ठल मंदीरात खास आरस करण्यात आली आहे.

मंदिर समितीने कधी तुळशीच्या तर कधी शेवंतीच्या फुलांनी यापूर्वी गाभाºयाची सजावट केली होती़ लाल गुलाब हव्या त्या संख्येत मिळत नसल्याने अखेर मंदिर समितीने अनेक ठिकाणाहून हे गुलाब मागवून आज देवाच्या गाभाºयात ही सजावट केली आहे. या फुलांची करण्यात आलेली सजावटीने विठ्ठल रुक्मिणीचे अनोखे रूप खुलून दिसत असून देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे.


 

Web Title: Vasubaras today; The garb of the Vitthal Temple in Pandharpur is decorated with flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.