तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 11:01 AM2021-07-24T11:01:06+5:302021-07-24T11:21:15+5:30

Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत.

Urgent help needed! The youth tweeted directly to the Chief Minister Uddhav Thackeray and saved the lives of 15 people | तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

googlenewsNext

रत्नागिरी/सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात पूरस्थिती दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. (Chiplun Flood) तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्येही पुराने आपली भीषणता दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्यावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मदतीसाठी जनतेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. (The youth tweeted directly to the Chief Minister Uddhav Thackeray and saved the lives of 15 people) 

मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण शहराला पुराने वेढा घातला असताना तेथील पुरात अडकलेले रहिवासी मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधत होते.पुरात अडकलेल्या अशाच काही जणांचा अतुल पाटील या तरुणाशी संपर्क झाला असता त्याने थेट मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट करत परिस्थितीची माहिती दिली. ''तातडीची मदत पाहिजे.  कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे सावित्री नदीचा प्रवाह भयंकर आहे. तिथे १५ माणसे रात्रीपासून छतावर अडकली आहेत. नदी आणि घर एक आहे अशी स्थिती आहे. हात जोडून विनवणी करतो. लवकरात लवकर मदत पोहोचवा, असे ट्विट या तरुणाने केले या ट्विटची दखल घेत शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाली झाल्या. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेत तिथे अडकलेल्या गर्भवती महिलेसह एकूण १५ जणांची सुटका केली. 

सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील रहिवाशी असलेला अतुल राजाभाऊ पाटील हा तरुण चिपळूण येथे शिक्षणासाठी होता. त्यावेळी चिपळूणमध्ये तो ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता. तेथील रहिवाशी परवा चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे पाण्यात अडकून पडले होते. ते मदतीसाठी मोबाईलवरून याचना करत होते. त्यातील एकाचा संपर्क अतुल पाटील याच्याशी झाला. त्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवले आणि ट्विटरचा वापर करत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आणीबाणीच्या प्रसंगी अतुलने दाखवलेल्या प्रसंगावधाचे आता कौतुक होत आहे.

याबातत प्रतिक्रिया देताना अतुल पाटील याने सांगितले की, चिपळूणमध्ये पुरात अडकलेल्या काही निटवर्तीयांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विट केले. त्यानंतर मला या बिकट परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा किती सतर्क आहे, याची जाणीव झाली. माझ्या ट्विटची दखल घेऊन पुरात अडकलेल्यांपर्यंत मदत पोहोचवली गेली. माझे प्रयत्न यशस्वी ठरले याचे समाधान आहे.

Read in English

Web Title: Urgent help needed! The youth tweeted directly to the Chief Minister Uddhav Thackeray and saved the lives of 15 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.