उजनीतून भीमा नदीत ३६०० क्युसेकने विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:35 PM2019-09-05T13:35:16+5:302019-09-05T13:37:11+5:30

भीमानगर :  रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे २७ हजार २०३ क्युसेक वेगाने खडकवासला धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे. २० ...

From Ujani, the river started crossing the river at Bhima | उजनीतून भीमा नदीत ३६०० क्युसेकने विसर्ग सुरू

उजनीतून भीमा नदीत ३६०० क्युसेकने विसर्ग सुरू

Next
ठळक मुद्देभीमानदीच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणारवीरमधून नीरानदीत ३२५०० क्युसेकने विसर्ग सुरूनीरेच्या व भीमेच्या पाण्यात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाढ होणार

भीमानगर :  रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे २७ हजार २०३ क्युसेक वेगाने खडकवासला धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे.

२० आॅगस्टपासून पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीत पावसाने विश्रांती घेतल्याने बंडगार्डन व दौंडमधून येणारा विसर्ग जवळपास १२०० क्युसेकवरती आला होता, परंतु मंगळवारी व बुधवारी रात्री ११ वाजल्यापासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले, त्यात ११ वाजता ७ हजार ७०६ क्युसेक, पहाटे २ वाजता १३ हजार ९८२, पहाटे ४ वाजता १८ हजार ४९२, पहाटे ५ वाजता २२ हजार ८८१ क्युसेक एवढे पाणी सोडण्यात आले होते.

दरम्यान, मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता पुन्हा एकदा शिवणे-नांदेड पूल आणि पहाटे साडेचार वाजता डेक्कन येथील भिडे पूल पाण्याखाली गेला; मात्र वरसगाव आणि पानशेत धरणातून सोडण्यात आलेले पाणी खडकवासला धरणात येत असल्याने खडकवासला धरणाच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजता २७ हजार २०४ क्युसेक पाणी सोडण्यात  आले. तर मुळशी धरणातून सकाळी ८ वाजता १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले .तर सायंकाळी बंडगार्डन येथून ४८८०० क्युसेक विसर्ग उजनीत येतोय.

पुणे जिल्ह्यातील धरणातून येणाºया मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे उजनी धरणातून पुन्हा भीमा नदीत २ हजार व वीजनिर्मिती १६०० असे ३६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी भीमानदीच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर वीरमधून नीरानदीत ३२५०० क्युसेकने विसर्ग सुरू असून नीरेच्या व भीमेच्या पाण्यात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


उजनीची सद्यस्थिती
- एकूण पाणी पातळी ४९७.०० मी.
- एकूण पाणीसाठा ३३७७.४६ दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा १५७४.६५ दलघमी
- टक्केवारी १०४ %

उजनीत विसर्ग
- बंडगार्डन ४८८००
- दौंडमधून ५४७०

उजनीमधून विसर्ग
- भीमानदी २०००
- वीजनिर्मिती १६००
- कालवा ३१५०
- बोगदा १२००
- वीरमधून नीरेत ३२५००

Web Title: From Ujani, the river started crossing the river at Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.