“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 21:44 IST2025-12-09T21:43:53+5:302025-12-09T21:44:10+5:30

Deputy CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

there is no other chief minister in the country who can explain the indian constitution to the common man in easy language deputy cm eknath shinde praises cm devendra fadnavis | “संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक

“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक

Deputy CM Eknath Shinde News: संविधान समजून घेणारा आणि ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत मांडणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही, अशा गौरवोद्गारांतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. विधानसभेत फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू वृत्तीपासून कार्यशैलीपर्यंत अनेक अंगांनी स्तुती केली. 

मार्चमधील विधानमंडळ अधिवेशनात संविधानावर झालेल्या सर्वपक्षीय चर्चेत फडणवीस यांचे भाषण हे “चर्चेचा कळसाध्याय ठरले” असे सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचा इतिहास, त्याची वाटचाल, तत्त्वज्ञान आणि उदाहरणांद्वारे विविध पैलू अतिशय सोप्या भाषेत उलगडले असून त्याच भाषणाचे हे पुस्तक आता समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे. फडणवीस यांच्या कायद्यावरील दांडग्या अभ्यासाचा, अर्थशास्त्रातील सखोल पकडीचा आणि प्रशासन हाताळण्यातील कौशल्याचा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले की, नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास त्यांच्या क्षमतेचे प्रतीक आहे. 

फेक नॅरेटिव्हचाही त्यांनी पर्दाफाश केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत. गंभीर परिस्थितीतही शांत, स्थिर आणि थंड डोक्याने निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अद्वितीय आहे. कलम ३७० ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी होते, हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखल्यांसह स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ते ऐतिहासिक कार्य पूर्ण केले, याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. संविधान धोक्यात असल्याच्या फेक नॅरेटिव्हचाही त्यांनी पर्दाफाश केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

रुग्णांना आधार देणारा हा हळवा माणूस 

कर्करोगाने वडिलांचे निधन झाल्यानंतर नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारून रुग्णांना आधार देणारा हा हळवा माणूस आम्ही पाहिला आहे, असे सांगत त्यांनी २०२२ मधील निर्णायक काळात फडणवीस यांनी दिलेला मित्रत्वपूर्ण आधारही स्मरला. अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे बॉलिवूडचे ‘बिग बी’, त्याप्रमाणे देवेंद्रजी सभागृहाचे ‘BIG D’ — Dedication, Determination, Discipline आणि Devotion, अशा शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला.

दरम्यान, पुस्तकाचा प्रसार सर्व भाषांत व्हावा, राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय व ग्रंथालयात ते उपलब्ध व्हावे, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ते संदर्भग्रंथ म्हणून वापरावे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनीही हे पुस्तक वाचून अध्ययन करावे, अशी त्यांनी सूचना केली. देवेंद्रजी अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक भाषण करत राहोत. अशा अनेक पुस्तकांचा लाभ महाराष्ट्राला मिळत राहो, अशी शुभेच्छाही त्यांनी दिल्या. तसेच संविधान मूल्यांची जपणूक, लोकशाही बळकट करण्याचा संकल्प आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याची कटिबद्धता व्यक्त करत राज्यपाल, सभापती व आयोजकांचे आभार मानले.

 

Web Title : शिंदे ने फडणवीस की प्रशंसा की: वे CM हैं जो संविधान को सरलता से समझाते हैं।

Web Summary : एकनाथ शिंदे ने देवेंद्र फडणवीस की संविधान की गहरी समझ और इसे सरलता से समझाने की क्षमता की सराहना की। शिंदे ने फडणवीस के ज्ञान, प्रशासनिक कौशल और समर्पण पर प्रकाश डाला, उन्हें विधानसभा का 'BIG D' कहा। उन्होंने संविधान के बारे में झूठे आख्यानों को दूर करने के लिए फडणवीस की प्रशंसा की।

Web Title : Shinde praises Fadnavis: A CM who explains the Constitution simply.

Web Summary : Eknath Shinde lauded Devendra Fadnavis for his deep understanding of the Constitution and ability to explain it simply. Shinde highlighted Fadnavis's knowledge, administrative skills, and dedication, calling him the 'BIG D' of the assembly. He praised Fadnavis for dispelling false narratives about the Constitution.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.