"लॉकडाऊन नाही तर 'टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट' हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय", देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 03:52 PM2021-03-27T15:52:48+5:302021-03-27T16:04:44+5:30

Devendra Fadnavis : कोरोनाचा प्रादुर्भावर नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

'Test, Trace and Treat' is an effective way to prevent corona, not lockdown, advises Devendra Fadnavis | "लॉकडाऊन नाही तर 'टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट' हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय", देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

"लॉकडाऊन नाही तर 'टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट' हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय", देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे.

मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. यावरून भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येणार्‍या काळात कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे, असे सांगत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भावर नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ('Test, Trace and Treat' is an effective way to prevent corona, not lockdown, advises Devendra Fadnavis)

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. "अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली", असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

दुसऱ्या ट्विटमध्ये कोरोना चाचण्या वाढविण्याचे सूत्र सांगितले आहे. "गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!" असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

(Coronavirus Update : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम; चोवीस तासांत ३६,९०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद)

दरम्यान, काल दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १७ हजार ०१९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर ११२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत २६ लाख ३७ हजार ७३५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २३ लाख ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ८२ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८७.२ टक्के इतका आहे. 

राज्यात रात्रीची जमावबंदी
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी ( २८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश शुक्रवारी मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: 'Test, Trace and Treat' is an effective way to prevent corona, not lockdown, advises Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.