Supreme Court listen Dhananjay Mundane side | तूर्तास दिलासा ; सर्वोच्च न्यायालय धनंजय मुंडेंची बाजू ऐकून घेणार
तूर्तास दिलासा ; सर्वोच्च न्यायालय धनंजय मुंडेंची बाजू ऐकून घेणार

मुंबई - सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले असल्याने मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच मुंडे यांनी, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी दिले आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंडे यांची बाजू ऐकून घेण्याची संधी दिल्याने त्यांना तूर्तास दिलासा मिळाला असून,यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.


या प्रकरणी, जगमित्र शुगर मिल्ससाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमीन कुणाचीही फसवणूक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांना व बँकांना ५४०० कोटी रुपयांना बुडविणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई राजाभाऊ फड यांनी राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरुद्ध तक्रार दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे व महसूल कागदपत्रे आपल्या बाजूने आहेत, असा दावा मुंडे यांनी केला आहे.


 


Web Title: Supreme Court listen Dhananjay Mundane side
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.