घरात बसूनच परीक्षा देण्यास परवानगी, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:47 PM2020-09-03T18:47:47+5:302020-09-03T18:49:26+5:30

अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती

Students allowed to take exams from home, final year exam dates announced, says uday samant | घरात बसूनच परीक्षा देण्यास परवानगी, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित

घरात बसूनच परीक्षा देण्यास परवानगी, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित

googlenewsNext
ठळक मुद्देअंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे, आता लवकरात लवकर विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा घेऊन निकाल लावणे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. त्यासाठी, महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून याच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टीकल परीक्षा होऊ शकते, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. 

विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. त्यानंतर, आज या परीक्षांच्या तारख्या अंदाजे स्वरुपात जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 15 ते 30 सप्टेंबर प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात. तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षाचे नियोजन आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न विद्यापीठांकडून होईल. विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली असून सोप्या पद्धतीनं परीक्षा होतील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती. परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरूंचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे, समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्यपालांनी केल्याचे सामंत यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितले. ऑनलाइन परीक्षांबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह गरीब विद्यार्थ्यांसमोर नेटवर्क आणि संसाधनांच्या समस्या आहेत. त्यावर सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाचीच असेल, असेही सामंत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
 
एमएचटी-सीईटी परीक्षेबाबत

''उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा.'', अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन दिली आहे. 

Web Title: Students allowed to take exams from home, final year exam dates announced, says uday samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.