घटस्थापनेच्या मुहूर्तावर घरपोच कनेक्टचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:53 AM2020-10-16T11:53:35+5:302020-10-16T11:59:34+5:30

navratri, industry, mumbai लॉकडाउनमुळे घरीच बंदिस्त झालेले जनजीवन, व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक आर्थिक संकटात सापडले असताना स्वदेशी वस्तू थेट घरीच पोहोच करण्याचा घरपोच कनेक्ट या नव्या उपक्रमाला घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे.

Start of home delivery at the moment of navratri | घटस्थापनेच्या मुहूर्तावर घरपोच कनेक्टचा प्रारंभ

घटस्थापनेच्या मुहूर्तावर घरपोच कनेक्टचा प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देघटस्थापनेच्या मुहूर्तावर घरपोच कनेक्टचा प्रारंभई बाजारपेठेद्वारे घरपोच मिळणार आता स्वदेशी वस्तू

मुंबई : लॉकडाउनमुळे घरीच बंदिस्त झालेले जनजीवन, व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक आर्थिक संकटात सापडले असताना स्वदेशी वस्तू थेट घरीच पोहोच करण्याचा घरपोच कनेक्ट या नव्या उपक्रमाला घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे.

ई कॉमर्सच्या माध्यमातून स्वदेशी वस्तू घरपोच कनेक्टच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहेत. यामध्ये चारशेहून अधिक उत्पादकांच्या सुमारे पाच हजाराहून अधिक स्वदेशी उत्पादनांचा समावेश आहे. यात निम्म्याहून अधिक छोटे उत्पादक आहेत.

घरपोच कनेक्ट हे एक अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप असून केवळ नोंदविलेल्या व्यक्तींना या वस्तू घरपोच मिळणार आहेत. छोट्या उत्पादकांना एक व्यासपीठ मिळावे यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये कुटिरोद्योग, गृह उद्योग, महिला उत्पादक, महिलांचे बचत गट यांच्या राज्यातील प्रत्येक भौगोलिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे. विविध प्रकारचे मसाले, तळणीचे पदार्थ, पीठ, गोड पदार्थ, बेकरी उत्पादने, चटण्या, लोणची, जॅम, सुका मेवा, सरबत असे विविध विभागातील वस्तू उपलब्ध आहेत.

या ई बाजारपेठेच्या अ‍ॅपवरुन निवड आणि खरेदी केल्यानंतर ग्राहकांपर्यंत या वस्तू कुरियरमार्फत न पाठवता ग्राहक राहतात, त्या परिसरातील प्रतिनिधीमार्फत म्हणजे संवादकामार्फत त्या पोहोचवल्या जात आहेत. सुमारे ५0 वितरक, ५0 जिल्हा संयोजक आणि शेवटच्या ३000 उंबरठ्याच्या वस्तेत घरपोच कनेक्टचा चेहरा असणारे ७५00 संवादक असे वितरणाचे जाळे सज्ज झाले आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड करुन घेतले आहे.
विविध समाजमाध्यमांवरही हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

घटस्थापनेपासून विक्री सेवेस प्रारंभ

घरपोच कनेक्टच्या उत्पादनांची शुभारंभपूर्व विक्री सेवा घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजे उद्या, दि. १७ ऑक्टोबर रोजी सुरु होत आहे. शनिवार आणि रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी घरपोच कनेक्टच्या अ‍ॅपवरुन वस्तूंची ऑर्डर घेण्यात येत आहे. या वस्तू स्थानिक संवादकांच्यामार्फत सात दिवसांत घरपोच देण्यात येणार आहेत. यानंतर पुढील आठवड्याच्या ऑर्डर्स शुक्रवार, दि २३ आॅक्टोबर, शनिवार, दि. २४ ऑक्टोबर आणि रविवार,दि. २५ ऑक्टोबर या दसऱ्याच्या दिवशीही नोंदविण्यात येणार आहेत. या ऑर्डर्स पुढील सात दिवसांत घरपोच देण्यात येतील.

  • Gharpoch Connect चे Android ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक. 
  • https://play.google.com/store/apps/details?id=com.gharpoch.online 
  • आजवर ५ लाखाहून अधिक डाउनलोड 
  • वेबसाईट: www.gharpoch-connect.com   
  • फेसबुक पेज लाइक करा: https://www.facebook.com/GharpochConnect
  • इन्स्टाग्राम वर फॉलो करा: https://www.instagram.com/GharpochConnect

Web Title: Start of home delivery at the moment of navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.