ST Strike: एसटी कर्मचाऱ्याचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:26 PM2021-11-16T23:26:42+5:302021-11-16T23:27:03+5:30

माटरगाव येथील विशाल प्रकाश अंबलकार (वय २९) यांनी राहत्या घरी विष प्राशन केले.

ST Strike: Attempt to commit suicide by poisoning ST employee | ST Strike: एसटी कर्मचाऱ्याचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

ST Strike: एसटी कर्मचाऱ्याचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

Next

खामगाव : खामगाव बस आगारात सहाय्यक मॅकेनिकल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने माटरगाव येथे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विष प्राशन  केल्याची घटना घडली.

माटरगाव येथील विशाल प्रकाश अंबलकार (वय २९) यांनी राहत्या घरी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या तणावातूनच विशाल अंबलकार यांनी विष प्राशन केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Web Title: ST Strike: Attempt to commit suicide by poisoning ST employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.