एसटी बस व ट्रकची अमोरासमोर धडक; २७ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:00 AM2020-01-14T11:00:11+5:302020-01-14T11:29:27+5:30

टेंभूर्णा फाट्याजवळ सकाळी दहा वाजता झालेल्या या अपघातात बसमधील २७ प्रवासी जखमी झाले.

ST bus and truck collide in front of Amora; 2 passengers injured | एसटी बस व ट्रकची अमोरासमोर धडक; २७ प्रवासी जखमी

एसटी बस व ट्रकची अमोरासमोर धडक; २७ प्रवासी जखमी

Next
ठळक मुद्देजालना जिल्ह्यातील शिंदखेडा आगाराची बस अकोला येथून शिंदखेडाकडे जात होती.या बसमध्ये ४५ प्रवासी होते.ही धडक एवढी जोरदार होती की बस आणि ट्रकच्या दर्शनी भागाचा यामध्ये चुराडा झाला.

खामगाव: अकोला-सिंदखेडा (धुळे) बस व ट्रकमध्ये अपघात झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णाफाट्याजवळील जय भवानी पेट्रोलपंपासमोर सकाळी ९.५० वाजेदरम्यान घडली. या अपघातात बसमधील २७ प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी २२ सामान्य रुग्णालयात तर ५ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. 
अकोलावरून खामगावकडे अकोला- सिंदखेडा ही बस येत होती. दरम्यान जय भवानी पेट्रोलपंपाजवळ एक कार ओव्हरटेक करत होती. यामुळे ट्रकची धडक बसला लागली. यामध्ये २७ प्रवाशी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी प्रवाशांना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी धावपळ केली. खामगाव ग्रामिण पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींमध्ये कमल लक्ष्मणराव बोदडे (वय ६७) रा. यवतमाळ, विमल गजानन पानझोडे (वय ४०) रा. पळशी बु, लिना मधुकर बाळापूरे (वय ६०) रा. खानापूर पातूर, प्रभाकर बजरंग बोदडे (वय ७०) रा. अकोला, अनिल कुमार नंदणेराय (वय ६५) रा. नागपूर, प्रमिला शांतीलाल (वय ८) रा. सेंधवा, निलेश शांतीलाल (वय ४) रा. सेंधवा, अमिता शांतीलाल (वय ३५) रा. सेंधवा, प्रार्थना भिमराव साघरे (वय ३८) रा. अकोला, रविंद्र रमेश पाटील (वय ३९) रा. धुळे, विनोद रतन सटाले (वय ४८) रा. अकोला, उमाजी बाळू वडिले, मुडावत जि. धुळे, गजानन प्रभाकर बोदडे (वय ५७) रा. पळशी, मतुथवार खाटी (वय ६३) रा.निजाळा, रमाबाई बब्बू रब्टी (वय ५५) रा. कटळ, शुभम गाडेकर (वय २०) रा. संबापूर, चंद्रकांत रामकृष्ण डांगे (वय ५०) रा. अकोला, विमल प्रभाकर बोदडे (वय ६२) रा. अकोला सफर अंसारी (वय २०) रा. शहादा, विष्णू अरविंद गावंडे (वय ३३) रा. अकोला व नुरजहॉ सादिक अंसारी (वय २५) रा. शहादा यांचा समावेश आहे. या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर उर्वरीत ५ प्रवाशांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका कारला वाचवण्याचा हा प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

Web Title: ST bus and truck collide in front of Amora; 2 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.