सोनाली कुलकर्णी ‘सखी मंच’ची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’

By Admin | Published: January 10, 2016 01:04 AM2016-01-10T01:04:49+5:302016-01-10T01:04:49+5:30

विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतने ‘सखी मंच’ हा उपक्रम सुरू केला. महिलांचे केवळ मनोरंजनच नाही, तर त्यांना यामधून काही तरी

Sonali Kulkarni brand ambassador of Sakhi platform | सोनाली कुलकर्णी ‘सखी मंच’ची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’

सोनाली कुलकर्णी ‘सखी मंच’ची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’

googlenewsNext

पुणे : विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतने ‘सखी मंच’ हा उपक्रम सुरू केला.
महिलांचे केवळ मनोरंजनच नाही,
तर त्यांना यामधून काही तरी
शिकता यावे, त्यांची प्रगती
व्हावी आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये केले जाते. यंदाच्या वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लोकमत सखी मंचची २०१६-२०१७ वर्षांसाठी अ‍ॅम्बॅसिडर असणार आहेत.
सोनाली कुलकर्णी एक नृत्यांगना असून तिने अभिनय क्षेत्रातही तिचा ठसा उमटवला आहे. आजवर सोनालीने गाढवाचं लग्नं, बकुळा नामदेव घोटाळे, आबा जिंदाबाद, हाय काय नाय काय, नटरंग, क्षणभर विश्रांती, अजिंठा, झपाटलेला २, रमामाधव, मितवा, क्लासमेट्स, टाईमपास २, शटर या चित्रपटांत अभिनय केला आहे,
तर नटरंगमधील ‘अप्सरा’ गाण्यातील सोनालीच्या नृत्याने आणि अभिनयाने तमाम प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. याबरोबरच हिंदीतील
सिंघम रिटर्न्स आणि ग्रँड मस्ती
या चित्रपटांमधूनही तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. (प्रतिनिधी)

आनंददायी प्रवास...
लोकमत सखी मंचची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर सोनाली सांगते, ‘लोकमत सखी मंचची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर झाल्याचा मला विशेष आनंंद आहे. कारण यापूर्वी मला लोकमत युवा नेक्स्टच्या माध्यमातून तमाम तरुणाईशी संवाद साधता आला होता. आता सखी मंचमुळे मला विविध क्षेत्रांतील महिलांशी संवाद साधता येईल. युवा नेक्स्ट ते सखी मंच हा माझा प्रवास खूप आनंददायी आहे. यामुळे मला विविध शहरांतील आणि क्षेत्रांतील महिलांना भेटून त्यांचे अनुभव जाणून घेण्याची संधी मला मिळाली आहे.’

Web Title: Sonali Kulkarni brand ambassador of Sakhi platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.