सोलापूरच्या गिर्यारोहकांनी माउंट एल्ब्रूसवर फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 05:04 PM2019-08-16T17:04:13+5:302019-08-16T17:08:58+5:30

युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणारा १० वर्षीय साई कवडे सर्वात लहान आशियाई पुरुष

Solapur climbers hit the tricolor on Mount Elbrus | सोलापूरच्या गिर्यारोहकांनी माउंट एल्ब्रूसवर फडकविला तिरंगा

सोलापूरच्या गिर्यारोहकांनी माउंट एल्ब्रूसवर फडकविला तिरंगा

Next
ठळक मुद्देमोहीम सह्याद्रीच्या लेकरांची असे या मोहिमेचे नाव असून या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केलेयुरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्यामध्ये हे शिखर वसलेलं आहे.जॉर्जिया देशाच्या बोर्डर पासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे.

सोलापूर :जगातील सर्वोच्च शिखरांपैकी असलेले युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस सर करून महाराष्ट्रातील सह्याद्रीतील गियार्रोहकानी इतिहास घडवला़ साई कवडे हा १० वर्षाचा चिमुकला सर्वात लहान आशियाई व्यक्ती ठरला आहे. याशिवाय लिंगाणा १६ मिनिटात चढणारा सागर नलावडे, पहिला पोलीस कॉन्स्टेबल तुषार पवार, पहिला एसबीआय कर्मचारी भूषण वेताळ यांनीहीा 15 आॅगस्ट च्या पहाटे शिखरावर तिरंगा फडकवला.  

मोहीम सह्याद्रीच्या लेकरांची असे या मोहिमेचे नाव असून या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले़ रशियामध्ये असलेले युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्यामध्ये हे शिखर वसलेलं आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डर पासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरु असलेली मोठ-मोठी वादळे माउंट अल्ब्रूस चढाईतील मुख्य अडचण आहे.

१४ आॅगस्टच्या मध्यरात्री अंतिम चढाईस या टीमने सुरू केली होती. हाडे गोठवणारी थंडी, उणे तापमान या सर्वांना तोंड देत १५ आॅगस्टच्या सकाळी ७.३० वाजता यांनी युरोपच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला. याशिवाय मोहिमेत असलेल्या सागर नलावडे याने रायगडावरील माती, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शिखरावर नेहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. नोव्हेंबर २०१९ मध्ये हीच टीम आॅस्ट्रेलिया येथील सर्वोच्च शिखर सर करणार आहे असे आनंद बनसोडे यांनी सांगितले.
-----------------------
या मोहिमेद्वारे भरपूर विक्रम केले असून भारताचा सर्वोच्च तिरंगा फडकवताना आमची छाती अभिमानाने फुलून आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या शिखरावर नेहून सह्याद्रीची लेकरांची मोहीम हे नाव आम्ही साध्य केले़
- सागर नलावडे
लिंगाणा विक्रमवीर गियारोहक़
---------
या मोहिमेत 'युनायटेड वी स्टँड' असा संदेश देऊन जातीय सलोखा राहावा असा संदेश दिला. भारतातील पहिला एसबीआय कर्मचारी बनण्याचा मान मला मिळत आहे़ त्याबद्दल खूप आनंद होत आहे.
- भूषण वेताळ
एसबीआयचा प्रथम गियारोहक़
--------
पोलीस दलातुन जास्तीत जास्त गियारोहक बनावेत, यासाठी महाराष्ट्रातील प्रथम पोलीस म्हणून या शिखरावर तिरंग्याला अभिवादन केले.
- तुषार पवार
महाराष्ट्र पोलीस गियारोहक़ 

Web Title: Solapur climbers hit the tricolor on Mount Elbrus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.