Good News; निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी केंद्राची सोलापूरला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:07 PM2019-11-01T13:07:22+5:302019-11-01T13:10:35+5:30

जिल्हाधिकाºयांनी दिली माहिती: तीन वर्षांत उत्पादन दुप्पट करण्याचा जिल्हाधिकाºयांनी केला संकल्प

Solapur is the center of choice for exportable pomegranate production | Good News; निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी केंद्राची सोलापूरला पसंती

Good News; निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी केंद्राची सोलापूरला पसंती

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकारने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यासाठी सांगली, संत्रा उत्पादनासाठी नागपूर आणि डाळिंब उत्पादनासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड केलीमहाराष्ट्रातून दरवर्षी ७0 हजार मेट्रिक टन डाळिंबाची परदेशात निर्यात होते. त्यात सोलापूरचा वाटा ३0 हजार मेट्रिक टन इतका आहे.निर्यातक्षम फळांचा क्लस्टर वाढविण्यासाठी केंद्र शासनाने योजना लागू केली आहे. यासाठी शासनाकडून शेतकºयांना पन्नास टक्के अनुदान दिले जाणार

सोलापूर : केंद्र सरकारने निर्यातक्षम डाळिंब उत्पादित करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी  दिली. 

केंद्र सरकारने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यासाठी सांगली, संत्रा उत्पादनासाठी नागपूर आणि डाळिंब उत्पादनासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड केली आहे. महाराष्ट्रातून दरवर्षी ७0 हजार मेट्रिक टन डाळिंबाची परदेशात निर्यात होते. त्यात सोलापूरचा वाटा ३0 हजार मेट्रिक टन इतका आहे. यातील ४ हजार टन डाळिंब युरोपला तर २६ हजार मेट्रिक टन डाळिंब इतर देशात निर्यात होतात. निर्यातक्षम फळांचा क्लस्टर वाढविण्यासाठी केंद्र शासनाने योजना लागू केली आहे. यासाठी शासनाकडून शेतकºयांना पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये मुख्यत्वे करून विषमुक्त फळ उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणे व शीतगृह, यंत्र व प्रशिक्षणासाठी हे अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

या समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपसंचालक रवींद्र माने, अपेडाचे उपव्यवस्थापक देवेंद्र प्रसाद, डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. मल्लिकार्जुन, डॉ. विजय अमृतसागर, प्राचार्य डॉ. विश्वनाथ शिंदे, प्रभाकर चांदणे, एस. व्ही. तळेकर, एम. ए. मुकणे, व्ही. बी. भिसे, एस़ सी. पाटील, प्रशांत डोंगरे, अंकुश पडवळे आदी उपस्थित होते. 

बैठकीत अपेडाचे उपव्यवस्थापक देवेंद्र प्रसाद यांनी योजनेची माहिती दिली. डाळिंब निर्यातीला मोठा वाव आहे. प्रयोगशील शेतकºयांनी उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे सांगितले. कृषी अधीक्षक बिराजदार यांनी जिल्ह्यातील डाळिंबाची सद्यस्थिती सांगितली. जिल्ह्यात ४१ हजार ८0८ हेक्टर क्षेत्रावर भगवा, आरक्ता, मृदुला, ढोलका, गणेश, रुबी या जातीच्या डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. निर्यातक्षम डाळिंब पिकविणाºया शेतकºयांची संख्या सुमारे ८0१ इतकी आहे. जिल्ह्यात विषमुक्त शेतीप्रयोगाला चालना मिळाली आहे. यात डाळिंबाचे उत्पादनही कीटकनाशकाच्या वापराविना सुरू झाले आहे. शेतकरी व शेतात काम करणाºया कामगारांना प्रशिक्षण मिळाले तर उत्पादन वाढणार आहे. 

आराखडा तयार करण्याचे आदेश
सोलापूर जिल्ह्यातून येत्या तीन वर्षांत निर्यात दुप्पट करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कृषी अधिकाºयांना दिल्या. डाळिंबाचे क्षेत्र ५१ हजार हेक्टरवर नेण्यासाठी सर्वस्तरातील शेतकºयांना या योजनेत सामावून घ्यावे. प्रत्येक तालुका कृषी कार्यालयामार्फत प्रयोगशील शेतकºयांपर्यंत ही योजना पोहोचवून नवीन निर्यातदार शेतकरी तयार करावेत. यासाठी शेतीतील मजुरांना प्रशिक्षण मिळावे, अशी सोय करावी. या योजनेतून मिळणाºया अनुदानासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना केल्या. आठवडाभरात कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे कृषी अधीक्षक बिराजदार यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील डाळिंबाचे क्षेत्र
जिल्ह्यातील निर्यातक्षम डाळिंबाचे तालुकानिहाय क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे. उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट: प्रत्येकी ३८00 हेक्टर, मोहोळ: ३८0१, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला,माढा, बार्शी, करमाळा: प्रत्येकी ३८0१ हेक्टर. आता प्रत्येक तालुक्यातील क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १६ हजार २0, आंब्याचे ४ हजार १७८, भाजीपाल्यांचे २२ हजार १८१ हेक्टर इतके क्षेत्र आहे. 

Web Title: Solapur is the center of choice for exportable pomegranate production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.