... तर आम्ही साथ देण्यासाठी तयार, नाना पटोलेंची गडकरींना खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 03:39 PM2022-09-10T15:39:45+5:302022-09-10T15:40:18+5:30

भाजपवरही केली जोरदार टीका.

So we are ready to support congress leader Nana Patoles open offer to bjp minister nitin Gadkari | ... तर आम्ही साथ देण्यासाठी तयार, नाना पटोलेंची गडकरींना खुली ऑफर

... तर आम्ही साथ देण्यासाठी तयार, नाना पटोलेंची गडकरींना खुली ऑफर

googlenewsNext

भाजपमधील मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. तर अनेकदा त्यांनी सरकारच्या कामकाजावरही टीक केली होती. सरकार वेळेवर निर्णय घेत नसल्याचेही त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. दरम्यान, आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गडकरी यांना खुली ऑफर दिली आहे.

“जर नितीन गडकरी मला भेटले, तर त्यांची जी काही समस्या आहे, जे ते सातत्यानं मांडत आहेत. त्यांना आमचं एकच सांगणं आहे, जर देशात चुकीचं सरकार आलं आहे आणि त्यात त्यांना अस्वस्थ वाटत असेल तर आम्ही त्यांना साथ देण्यास तयार आहोत,” असे पटोले म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

भाजपवर टीका 
देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. त्यांच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून यातूनच 'भारत जोडो यात्रे'मुळे भाजपला धडकी भरली आहे, हे सिद्ध होत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

“काँग्रेस संपली, राहुल गांधी यांना भाजपा महत्व देत नाही असे म्हणणारे भाजपाचे डझनभर नेते, प्रवक्ते, मंत्री राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी व त्यांची बदनामी करण्यासाठी अहोरात्र झटत असताना दिसत आहेत. राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु करताच भाजपाच्या नेत्यांची कोल्हेकुई सुरु झाली कारण या यात्रेला जनतेचाच प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी संवाद साधत राहुलजी गांधी देश पिंजून काढत आहेत. १५० दिवस ३५०० किमीचा प्रवास व १२ राज्यातून ही यात्रा जाणार आहे. सुरुवातीलाच भाजपाला भारत जोड़ो यात्रेची इतकी भीती वाटू लागली आहे. यात्रा जसजशी पुढे जाईल तसा मिळणारा प्रतिसाद भाजपाचे डोळे दिपवणारा असेल. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुलजी थेट केंद्र सरकारला जाब विचारत असून जनतेचे हे प्रश्नच महत्वाचे आहेत,” हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येते.

 

Web Title: So we are ready to support congress leader Nana Patoles open offer to bjp minister nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.