जय शिवाजी... दुर्मिळ अन् ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणारा यंदाचा राज्याभिषेक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 10:15 AM2021-06-05T10:15:41+5:302021-06-05T10:16:11+5:30

या वर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही शिवराज्याभिषेक दिनावेळी राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोना संकट काळात पार पडणारा हा दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा असेल. (Shivrajyabhishek sohala 2021)

Shivrajyabhishek sohala 2021 This time the chhatrapati shivaji maharaj coronation ceremony will be historic | जय शिवाजी... दुर्मिळ अन् ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणारा यंदाचा राज्याभिषेक सोहळा

जय शिवाजी... दुर्मिळ अन् ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणारा यंदाचा राज्याभिषेक सोहळा

googlenewsNext

 
मुंबई - रायगडावर दरवर्षी 6 जूनरोजी पार पडणारा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी काहीसा विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण यावेळचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवकालीन होनांच्या साक्षिने पार पडणार आहे, अशी माहिती युवराज संभाजी छत्रपती यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्टदेखील केली आहे. (Shivrajyabhishek sohala 2021 This time the chhatrapati shivaji maharaj coronation ceremony will be historic)

राज्यात ६ जून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार,हसन मुश्रीफ यांची माहीती

संभाजी छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, "यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणार. स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा 'होन' हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक 'होन'च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार."

या वर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही शिवराज्याभिषेक दिनावेळी राज्यावर कोरोनाचे संकट होते. कोरोना संकट काळात पार पडणारा हा दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा असेल.

 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ५१ गडांवर 'असा' साजरा होणार 'शिवराज्याभिषेक दिन'

मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या -
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर, खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे 5 महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदनही दिले होते. एवढेच नाही, तर 6 जूनपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही, तर रायगडावरूनच घोषणा होईल, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. यानंतर नाशिकमध्ये बोलताना, मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक सोहळ्यादिवशी 6 जूनला रायगडावर या, असे आवाहनही संभाजीराजेंनी मराठा बांधवांना केले होते. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे आवाहन संभाजीराजेंनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना केले. 
 

Web Title: Shivrajyabhishek sohala 2021 This time the chhatrapati shivaji maharaj coronation ceremony will be historic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.