ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 09:53 AM2021-12-05T09:53:44+5:302021-12-05T09:56:34+5:30

तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी, ममता बॅनर्जींचा आदित्य ठाकरेंना सल्ला; राऊत यांची माहिती.

shiv sena leader sanjay raut writes what happened in aditya thackeray mamata banerjee meeting demanded tata cancer hospital | ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा

ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केली 'ही' मागणी; राऊतांनी सांगितला भेटीदरम्यानचा किस्सा

Next

नुकताच ममता बॅनर्जी (Mamata Banergee) यांनी मुंबईचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेटही घेतली होती. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट होऊ शकली नाही. परंतु या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांची भेट घेत ममता बॅनर्जी यांनी एक मागणी आणि विनंतीही केली. या भेटीदरम्यानचा एक किस्सा संजय राऊत यांनी सांगितला. 

‘‘प. बंगालमधून मुंबईत उपचारासाठी लोक येतात. विशेषतः परळच्या टाटा कॅन्सर इस्पितळात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. प. बंगालला एखादा भूखंड मिळाला तर तेथे ‘बंगाल भवन’ उभारता येईल व अशा गरजूंची व्यवस्था करता येईल. अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली,’’ अशी माहिती संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून केली. ममता बॅनर्जी यांची मागणी अवाजवी नाही. मुंबईच्या आसपास ओडिशा भवन, उत्तर प्रदेश भवन आधीच उभे राहिले आहे. प. बंगालचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक क्रांतीत योगदान आहे. दोन राज्यांत एक भावनिक नाते आहे. ते टिकवायला हवे, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंचं कौतुक
‘‘तुमच्या कामाची मी सतत माहिती घेत असते. खूप चांगले काम तुम्ही करताय. तुमच्याकडे पर्यटन विभाग आहे. बंगाल, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत पर्यटनाची देवाणघेवाण वाढायला हवी. प. बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाकडे महाराष्ट्रातील पर्यटनाचा ओघ आहे तो वाढला पाहिजे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले बंगाली जनतेस आकर्षित करतात,’’ असं म्हणत ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केल्याचेही त्यांनी सांगितले.

राजकारणाची सूत्रं हाती घ्या
"आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवले, तरीही त्या आल्या. तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करीत आहे. तरुणांची शक्ती मला माहीत आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवे!’’ असेही त्या म्हणाल्याचं राऊत यांनी नमूद केलं.

Web Title: shiv sena leader sanjay raut writes what happened in aditya thackeray mamata banerjee meeting demanded tata cancer hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.