बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 11:14 AM2021-11-15T11:14:56+5:302021-11-15T11:27:34+5:30

बाबासाहेब पुरंदरे यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Sharad Pawar says Babasaheb purandare deliverd the history of Chhatrapati shivaji maharaj to the each corner of Maharashtra, Their contribution will not be forgotten | बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही - शरद पवार

बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही - शरद पवार

Next

नाशिक - शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी ज्यांनी शेकडो व्याख्याने दिली आणि या संबंधीची आस्था तरुणांच्या मनात निर्माण करण्याची ज्यांनी काळजी घेतली, असे योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. यामध्ये एका गोष्टीचे समाधान म्हणता येणार नाही, पण ते दीर्घायुषी होते. वयाची 100 वर्ष पूर्ण करत असतांना सतत लोकांशी संवाद सुरु ठेवणे, हे यश लोकांच्या सेवेमुळे त्यांना मिळाले, परंतु ते आज नाहीत, याची अस्वस्तता, दुःख अनेकांच्या मनात आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

पवार म्हणाले, त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहार जो राज्यासमोर ठेवला. त्यात काही प्रमाणात वादग्रस्त मुद्देही होते. याबद्दल मत व्यक्त करतांना, मी स्वतः काही जाणकार नाही, इतिहासाच्या संबंधित तज्ज्ञ नाही. हे जरी खरं असलं, तरी इतकी मोठी कामगिरी कुणीही करतो, त्यासाठी आयुष्य खर्च करतो आणि त्याच्यामध्ये काही लोक दोष काढण्याचा प्रयत्न करतात. हे कदाचित त्यांच्या बाबतीतही केले गेले. मात्र त्यांचे योगदान विसरून चालणार नाही, असे पवार यावेळी म्हणाले.




बाबासाहेब पुरंदरे यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आज पहाटे  त्यांची  प्राणज्योत मालवली.

Web Title: Sharad Pawar says Babasaheb purandare deliverd the history of Chhatrapati shivaji maharaj to the each corner of Maharashtra, Their contribution will not be forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.