कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सेट परीक्षा पुढे ढकलली; विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 04:16 PM2020-05-20T16:16:40+5:302020-05-20T16:17:02+5:30

महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी येत्या 28 जूनला होती सेट परीक्षा

The set exam was postponed in view of the increasing prevalence of corona; University decision | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सेट परीक्षा पुढे ढकलली; विद्यापीठाचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सेट परीक्षा पुढे ढकलली; विद्यापीठाचा निर्णय

Next
ठळक मुद्देया परीक्षेसाठी दोन्ही राज्यातील तब्बल 1 लाख 11 हजार उमेदवारांनी केले अर्ज

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी येत्या 28 जून रोजी सहायक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन
पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या केंद्रांवर येत्या 28 जून रोजी सेट परीक्षा घेतली जाणार होती.या परीक्षेसाठी दोन्ही राज्यातील तब्बल 1 लाख 11 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या 9 हजारांनी वाढली आहे. परंतु, कोरोनामुळे विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सुध्दा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थीती विचारात घेऊन सेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिस्थीतीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भातील माहिती विद्यापीठाच्या वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: The set exam was postponed in view of the increasing prevalence of corona; University decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.