Sena has already decided to bring BJP in half? | मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यावर आणण्याचं सेनेचं आधीच ठरलं होतं?
मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यावर आणण्याचं सेनेचं आधीच ठरलं होतं?

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेला पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा केला असून सरकार स्थापनच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने यावेळी चाणाक्षपणे चाली खेळत भाजपला बाजुला सारले आहे. मात्र याची सुरुवात निवडणुकीपूर्वीच झाली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

2014 मध्ये आधी विरोधात आणि नंतर सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेला मागील पाच वर्ष भाजपने मंत्रीपदांसाठी झुरत ठेवलं. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभय पक्षांचं वैर पराकोटीला गेलं होतं. मात्र एवढं सगळ झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती झाली. यात शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र त्याचवेळी ही युती विधानसभेसाठी देखील राहिल असं ठरल होतं.

विधानसभेला ठरल्याप्रमाणे युतीसाठी चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बोलणी झाली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदासंर्भात काहीही बोलणं झालं नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर युती तुटली. 

दरम्यान जागा वाटपात मिळेल तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यात आणायचं अशी योजना तर शिवसेनेची नव्हती ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इरादा भाजपचा होता. मात्र देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे अखेर युती झाली. यामध्ये भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. परंतु, भाजप 122 हून 105 वर आले. त्यामुळे अर्थातच भाजपला बहुमतासाठी झगडावे लागत आहे. किंबहुना युतीमुळे भाजपची बहुमताची संधी हुकल्याचा मतप्रवाह आहे. 

उद्धव यांनी युतीत मिळेल तेवढ्या जागा मिळवून एकप्रकारे भाजपला बहुमतापासून रोखल्याचे दिसते. तसेच सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवत भाजपला सत्तेपासून बेदखल केले आहे. भाजपने राज्यात 164 जागा लढवल्या. स्ट्राईकरेट गेल्यावेळपेक्षा चांगला असला तरी सत्ता मिळाली नाही, हेच सत्य आहे. त्यामुळे सेनेचा तो डाव यशस्वी झाला का, असा प्रश्न भाजपनेत्यांना पडला आहे.  

Web Title: Sena has already decided to bring BJP in half?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.