“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:34 IST2025-12-02T17:32:20+5:302025-12-02T17:34:51+5:30
Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: या आधी नाशिकमध्येही बॅगा उतरल्याच होत्या, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: मालवण स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील संघर्ष वाढत चाललेला पाहायला मिळत आहे. सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या भरारी पथकाला छापेमारी करताना भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये दीड लाखाची रक्कम सापडली. याप्रकरणी आमदार निलेश राणे यांनी रात्रीत पोलीस ठाणे गाठत भाजप पदाधिकाऱ्यांवर आणि यंत्रणांवर गंभीर आरोप केले. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत थेट सवाल केला आहे.
आमदार निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून लाखांची रोकड पकडल्याने राजकीय रणकंदन माजले. यावरून आरोप-प्रत्यारोपही झाले. सोमवारी रात्री प्रचार संपल्यानंतर मालवण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत रात्री देवगड येथील एका कारमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडली. माहिती मिळताच आक्रमक बनलेल्या आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह मालवण पोलीस ठाणे गाठले. मतदानापूर्वी मध्यरात्री घडलेल्या या हायहोल्टेज ड्रामामुळे राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले आहे.
शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?
संजय राऊत यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण दौऱ्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. हेलिकॉप्टमधून उतरलेल्या एकनाथ शिंदे यांचे निलेश राणे स्वागत करत आहेत. यातच या व्हिडिओत एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही बॅगा असल्याचे दिसत आहे. यावरून संजय राऊतांनी विचारणा केली आहे. शिंदे मालवणात आले. येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिकमध्येही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र!, असे संजय राऊत यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, एकीकडे निलेश राणेंनी भाजपावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले. परंतु निलेश राणे आणि शिंदे-शिवसेना धुतल्या तांदळासारखी नाही. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे-शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
शिंदे मालवणात आले
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2025
येताना बॅगेतून काय आणले?
मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर!
या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या
लोकशाही ची ऐशी की तैशी?
जय महाराष्ट्र!
@ECISVEEP
@Dev_Fadnavis pic.twitter.com/TKXOXrv7FS