माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं मंत्रालयासमोर दूध दरासाठी आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:17 PM2021-06-10T14:17:54+5:302021-06-10T14:20:33+5:30

दूध दरासाठी सदाभाऊ खोत यांचं मंत्रालय परिसरात आंदोलन

Sadabhau Khot agitation for milk price in front of mantralaya | माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं मंत्रालयासमोर दूध दरासाठी आंदोलन 

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं मंत्रालयासमोर दूध दरासाठी आंदोलन 

Next

मुंबई: कोरोनाच्या परिस्थितीत शेतकरी हवालदील असतानाच दुधाचे दर कमी झाल्यामुळे रयत क्रांती संघटनेने आज राज्यव्यापी दुधासाठी आंदोलन करत आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयाजवळ दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांसह मंत्रालयासमोर दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. 

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाईच्या दुधाला १८ ते २० रुपये पर्यंत प्रति लिटर भाव मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार ३/५ फॅट व ८/5 एसएनएफ नुसार किमान २५ रुपये प्रति लिटर दर देणे आवश्यक आहे, परंतु या आदेशाला सहकारी व खासगी दुध संस्थाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दुध संस्था व खाजगी कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकंच नाही तर खाजगी दुध संस्थावर व खाजगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत FRP आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दुध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. ऊसासाठी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ७०/३० चा फ्लॅर्मुला आहे त्याप्रमाणे दुध उत्पादकांसाठी किमान ८५/१५ चा फ्लॅर्मुला करणे गरजेचे आहे. सध्या कोल्हापूर मधील गोकुळ दूध संघामध्ये ८१/१९ चा फॉर्मुलाकार्यरत आहे. १९६६-६७ नंतर संकरीकरणाचा तंत्रज्ञान युक्त वापर दिसत नाही. गिर, धारपारकर हे आमचे गाई ब्रीड जागतिक आदर्शवत आहेत या जातींच्या गाईचे संगोपन होणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दुध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दुध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे.

या सर्व मागणीसाठी सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंत्रालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव मा. अनुपकुमार यांची मंत्रालयामध्ये भेट घेण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे सचिवांनी कबुल केले.

Web Title: Sadabhau Khot agitation for milk price in front of mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.