शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 07:17 PM2020-09-09T19:17:00+5:302020-09-09T19:45:34+5:30

साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणमुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

Sable and Waghire company should be instructed to change the name of VD: Dr. Amol Kolhe's demand to the Chief Minister | शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे

शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे

googlenewsNext
ठळक मुद्देसंभाजी बिडी प्रकरणी साबळे वाघिरे उद्योग समूहावर गुन्हा दाखल 

नारायणगाव : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने साबळे आणि वाघिरे कंपनीने विडी विक्रीस आणली आहे. यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत , अशी मागणी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

खा. कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की , छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे समस्त मराठी जनतेचे स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या नावाने विडीसारखे उत्पादन चालविणे सर्वथा अनुचित आहे. साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणली आहे. यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. संबंधित उत्पादकांना याबाबतची कल्पना देऊन शंभूप्रेमी मंडळींनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करुन सदर विडीचे नाव बदलण्याची विनंती केली. परंतु साबळे आणि वाघिरे कंपनीने याला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे या विषयावरुन शिवप्रेमी संघटना व जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडी सारख्या उत्पादनास असणे ही प्रत्येक राष्ट्राभिमानी  नागरिकासाठी खेदाची व संतापजनक बाब आहे. यामुळेच राज्य शासनाने  कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत , अशी मागणी खा . कोल्हे यांनी केली आहे .


संभाजी बिडी प्रकरणी साबळे वाघिरे उद्योग समूहावर गुन्हा दाखल 
 व्यसनाचा पदार्थ असलेल्या विडीला दिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हटवा या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले होते. या संघटनेतील काही पदाधिकारी पुरंदर किल्याच्या पायथ्याला उपोषणाला बसले होते. पाच दिवसानंतर संबंधित बिडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक काटे यांनी काल सासवड पोलीस ठाण्यात साबळे व वाघिरे व्यवसाय समुहाच्या संचालक आणि संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे... 

Web Title: Sable and Waghire company should be instructed to change the name of VD: Dr. Amol Kolhe's demand to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.