आर.आर. पाटील यांचे बंधू पोलीस खात्यातून निवृत्त, अखेरच्या दिवशी आईला ठोकला भावूक सॅल्युट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:59 PM2021-09-30T22:59:30+5:302021-09-30T23:00:35+5:30

R.R. Patil's brother retires from police department: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील आज पोलीस खात्यातून निवृत्त झाले. निवृत्तीवेळी ते करवीरचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते.

R.R. Patil's brother Rajaram Patil retires from police department, emotional salute to mother on last day | आर.आर. पाटील यांचे बंधू पोलीस खात्यातून निवृत्त, अखेरच्या दिवशी आईला ठोकला भावूक सॅल्युट

आर.आर. पाटील यांचे बंधू पोलीस खात्यातून निवृत्त, अखेरच्या दिवशी आईला ठोकला भावूक सॅल्युट

googlenewsNext

कोल्हापूर - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील आज पोलीस खात्यातून निवृत्त झाले. निवृत्तीवेळी ते करवीरचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सख्खा भाऊ राज्याचा गृहमंत्री असतानाही त्यांनी त्याचा फायदा न घेता प्रकाशझोतात न येता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. ३३ वर्षांच्या पोलीस सेवेमध्ये राजाराम पाटील यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आज अखेरच्या दिवशी त्यांनी आपल्या आईला कडक सॅल्यूट ठोकून वर्दीचा निरोप घेतला. (R.R. Patil's brother Rajaram Patil retires from police department, emotional salute to mother on last day)

एकीकडे आर.आर. पाटील राजकीय क्षेत्रा यशाची एक एक पायरी चढच असताना राजाराम पाटील यांनी पोलीस खात्यात सेवा सुरू केली. फौजदार म्हणून सुरुवात करणाऱ्या राजाराम पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक, निरीक्षक असे टप्पे पार करत निवृत्तीवेळी पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारली. मात्र या काळात आपण एका गृहमंत्र्याचे भाऊ असल्याचा कधी फायदा घेतला नाही. उलट आपल्यामुळे राज्याचा गृहमंत्री असलेला आपला भाऊ कधी अडचणीत येऊ नये यासाठी त्यांनी खबरदारी घेतली. 

पिंपरी चिंचवड येथे कर्तव्य बजावल्यानंतर सेवेतील शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना करवीरचे डीवायएसपी म्हणून नियुक्त करण्यात आले. तिथेच आज त्यांनी निवृत्ती स्वीकारली. कुटुंबात तात्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजाराम पाटील यांनी शेवटच्या दिवशी कर्तव्यावर जात असताना कुटुंबीयांचा निरोप घेतला. यावेळी त्यांनी जन्मदात्या आईला कडक सॅल्यूट ठोकत तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांचे इतर कुटुंबीयही उपस्थित होते.  

Web Title: R.R. Patil's brother Rajaram Patil retires from police department, emotional salute to mother on last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.