पालिकेकडून मनी व मुनीच्या चौकशीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर; सेनेच्या तक्रारीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 03:12 PM2017-09-24T15:12:03+5:302017-09-24T15:12:34+5:30

आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

Report of money and money related to money from municipal corporation submitted to State Election Commission; The interrogation of the Senna took place | पालिकेकडून मनी व मुनीच्या चौकशीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर; सेनेच्या तक्रारीची घेतली दखल

पालिकेकडून मनी व मुनीच्या चौकशीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर; सेनेच्या तक्रारीची घेतली दखल

Next

राजू काळे
भार्इंदर, दि. २४ - आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी राज्य निवडणूक आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला पाठविलेल्या पत्रात त्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेने नुकताच चौकशी अहवाल आयोगाला सादर केल्याचे पालिका उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.

निवडणुकीपूर्वी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळत नसल्याने त्याची दोरी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली. निवडणुकीत प्रचार सभांद्वारे भाजपालाच मतांचा जोगवा देण्याच्या आनाभाका घालण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपाच्याच हाती सत्ता यावी, यासाठी केंद्र तसेच राज्यातील भाजपा मंत्र्यांसह खासदार, आमदारांना मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान विविध खासगी संस्थांच्या मार्फत केलेल्या सर्वेक्षणात भाजपा ३५ ते ४० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली.

काहींनी पहिल्या क्रमांकावर शिवसेना तर काहींनी शिवसेना, भाजपा व काँग्रेसची त्रिशंकू सत्ता येणार असल्याचे भाकीत केले. या सर्वेक्षणामुळे बिथरलेल्या काही भाजपा उमेदवारांनी आपापल्या प्रभागांतील मतदारांना पैसे वाटल्याचे समोर येऊ लागले. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शहराला ख-या अर्थाने निवडणूक दंगलीचे स्वरुप येऊ लागले. याप्रकरणी पोलिसांत शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांनी त्या पैसे वाटपाविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात तथ्य आढळले नसल्याची क्लिन चीट पोलिसांकडुन देण्यात आल्याने विरोधकांची हवा गुल झाली. तरीदेखील ही निवडणूक हाती राखण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी चालविलेल्या भाजपाने अखेर धर्माचे शस्त्र बाहेर काढले. शहरात गुजराती, मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने धर्मगुरुंच्या माध्यमातुन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यांना भाजपाच्याच पारड्यात मते टाकण्याच्या आवाहनाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. आणि अखेर भाजपाने सत्तेसाठीचे बहुमत मिळविलेच. एकूण ९५ पैकी ६१ जागांवर विजय संपादन करून भाजपाचे एकहाती सत्तेचे स्वप्न सत्यात उतरले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिळविलेल्या अहवालात भाजपा ६० ते ६५ जागा मिळविणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने मतदानाच्या आदल्या दिवशीच भाजपा सत्ता काबीज करणार असल्याचे संकेत मिळाले होते. परंतु भाजपाने बहुमत मिळविण्यासाठी मनी आणि मुनीचाच वापर करुन सत्ता मिळविण्यासाठी धर्माचाच आधार घेतल्याचा आरोप करीत त्याच्या चौकशीची मागणी देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

Web Title: Report of money and money related to money from municipal corporation submitted to State Election Commission; The interrogation of the Senna took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.