शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

रावते, देसाई, कदम, शिंदे कॅबिनेटमंत्रीपदी

By admin | Updated: December 5, 2014 17:00 IST

विधानभवनाच्या प्रांगणात शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळयात शिवसेनेच्या ५ कॅबिनेट मंत्र्यांना राज्यपाल सी . विद्यासागर राव यांनी गोपनियतेची शपथ दिली.

ऑनलाइन लोकमत 
 
मुंबई, दि. ५ - विधानभवनाच्या प्रांगणात शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळयात शिवसेनेच्या ५ कॅबिनेट मंत्र्यांना राज्यपाल सी . विद्यासागर राव यांनी गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भाजपाच्या ५ कॅबिनेट व सेना-भाजपाच्या प्रत्येकी ५-५ राज्यमंत्र्यांना सुध्दा शपथ देण्यात आली. शिवसेनेच्या १० तर भाजपाच्या १० मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. 
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले एकनाथ शिंदे आणि डॉ. दीपक सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली तर भाजपाकडून गिरीश बापट, जामनेरचे आमदार गिरीश महाजन, मराठवाडयातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावणकुळे आणि अर्जूनी मोरगावचे आमदार व नितिन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजकुमार बडोले यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. 
 
मित्रपक्षांच्या नेत्यांची सोहळयाला दांडी 
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मित्रपक्षांची शपथविधी सोहळयाला अनुपस्थिती होती. रिपाइं नेते रामदास आठवले वगळता मित्रपक्षांच्या नेत्यांनी या सोहळयाकडे पाठ फिरवल्याचे दिसले.  तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांपैकी केवळ वसंत डावखरे या सोहळयाला उपस्थित होते. 
 
राज्यमंत्री - (शिवसेना ) 
संजय राठोड
दादा भुसे 
विजय शिवतारे 
दीपक केसरकर 
रवींद्र वायकर
 
राज्यमंत्री - (भाजप  ) 
राम शिंदे 
विजयकुमार देशमुख 
अंबरीश राजे आत्राम 
रणजित पाटील 
प्रविण पोटे