'...ज्यांनी ईडी, सीबीआयची पीडा मागे लावली, त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण'; राजू शेट्टींची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:19 PM2019-12-30T17:19:16+5:302019-12-30T17:19:53+5:30

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज

Raju Shetti reaction on Maharashtra Cabinet Expansion | '...ज्यांनी ईडी, सीबीआयची पीडा मागे लावली, त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण'; राजू शेट्टींची नाराजी

'...ज्यांनी ईडी, सीबीआयची पीडा मागे लावली, त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण'; राजू शेट्टींची नाराजी

Next

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सकाळपासून ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज असल्याचे समजते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हते. राजू शेट्टी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. ते म्हणाले, "ज्यांनी, ईडी, इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण आणि ज्यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटकपक्ष मात्र शपथविधीला बेदखल."

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार करताना सर्व घटक पक्षांना सामावून घेऊ, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वारंवार सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात यादीत स्वाभिमानाच्या एकाही नेत्याचे नाव नाही. आज दुपारी 1 वाजता विधानभवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला. मात्र, राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी पुण्यात थांबणे पसंत केले. याशिवाय, मंत्रिमंडळ विस्तार बैठकीलाही स्वाभिमानाला आमंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांनी शपथविधीपासून दूर राहणार असल्याचे संकेत दिले होते. 
 

Web Title: Raju Shetti reaction on Maharashtra Cabinet Expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.