‘कुटुंबप्रमुख म्हणून घराघरात जनजागृती करा’, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:33 AM2020-09-16T01:33:59+5:302020-09-16T01:34:24+5:30

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आयोजित एका आॅनलाइन मेळाव्यात राज्यातील २८ हजार सरपंचानी उपस्थिती लावली.

‘Raise awareness at home as the head of the family’, appeal of the Chief Minister | ‘कुटुंबप्रमुख म्हणून घराघरात जनजागृती करा’, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

‘कुटुंबप्रमुख म्हणून घराघरात जनजागृती करा’, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद््घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले. राज्यातील सरपंचांच्या आॅनलाइन मेळाव्यात या मोहिमेला सुरूवात झाली. प्रत्येक सरपंचाने एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवावी व परिवारांना आरोग्यसंपन्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आयोजित एका आॅनलाइन मेळाव्यात राज्यातील २८ हजार सरपंचानी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.
या मोहीमेच्या माध्यमातून आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत. या ऐतिहासिक मोहिमेद्वारे कोरोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखवेल. सरपंचांनी आपापल्या गावातील लोक हे मास्क घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन करत आहेत का, हात धुणे वगैरे स्वच्छता पाळताहेत का, अशा गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवावे. हे नियम पाळण्यास लोकांना बाध्य करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: ‘Raise awareness at home as the head of the family’, appeal of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.