Rain Update: मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची शक्यता; समुद्र खवळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 11:16 PM2020-10-14T23:16:27+5:302020-10-15T06:51:27+5:30

समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा

Rain Update: Heavy rains in Central Maharashtra, South Konkan and Goa | Rain Update: मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची शक्यता; समुद्र खवळणार

Rain Update: मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची शक्यता; समुद्र खवळणार

Next

मुंबई : तेलंगणावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या ६ तासांत १४ ऑक्टोबर रोजी पश्चिमेकडे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा सोलापूरपासून (मध्य महाराष्ट्र) ११० किलोमीटर पूर्वेला आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे पश्चिम-वायव्येकडे सरकत जाऊन पुढील १२ तासांत कमी होणार आहे. त्यानंतर, कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकून १६ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात महाराष्ट्र किनाऱ्याकडे येईल. महाराष्ट्रात अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात आगामी १२ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

१५ ऑक्टोबर : कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची (२० सेंमी प्रतिदिन)  शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकात पुढील १२ तासांत ३०-४० किलोमीटर ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.

१५ ऑक्टोबर : सकाळी महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

१६ ऑक्टोबर : संध्याकाळी अरबी समुद्राच्या ईशान्येकडे याचा वेग हळूहळू वाढत जाऊन ४५-५५ किमी प्रतितास ते ६५ किमी प्रतितास एवढा होईल.

१६ ऑक्टोबर : महाराष्ट्र किनारपट्टीवरील ईशान्य अरबी समुद्र खवळलेल्या स्थितीत असेल.

१६ ऑक्टोबर : पुढील तीन दिवस मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस आणि वाऱ्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गव्हाचे पीक, केळी, पपई आणि इतर फळबागा, शेवग्याच्या शेंगाची झाडे आणि भाज्यांचे नुकसान होईल. मुसळधार पावसामुळे कच्च्या बंधाऱ्यांचे नुकसान होईल. सखल भागांमध्ये पूर, पाणी साचणे, वाहतुकीत अडथळा, भूस्खलन होईल आणि पाणीसाठे निर्माण होतील. तसेच रस्ते ओले आणि निसरडे होतील. अतिवृष्टीमुळे नाल्यांमध्ये  अडथळा येऊन अचानक पूरस्थिती निर्माण होईल.            
 

Web Title: Rain Update: Heavy rains in Central Maharashtra, South Konkan and Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस