मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का? रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:32 PM2021-02-24T12:32:49+5:302021-02-24T12:35:42+5:30

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) पुन्हा ब्रेक लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याची एक शक्यता बोलून दाखवण्यात येत आहे

railway clarify on will the local train in mumbai to be closed again | मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का? रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का? रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकल ट्रेन संदर्भात चर्चारेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरणरेल्वे आणि महापालिकेकडून संयुक्तरित्या जगजागृती

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) पुन्हा ब्रेक लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याची एक शक्यता बोलून दाखवण्यात येत आहे. (railway clarify on will the local train in mumbai to be closed again)

सध्या सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येतो. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येत नाही. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा मुंबईची लाइफलाइन बंद होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना निर्धारित वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असून, दिवसाला ४० लाखाहून अधिक प्रवाशी लोकलचा प्रवास करतात. यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६,२१८ रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्क्यांवर

काय म्हणतात रेल्वेचे अधिकारी?

सामान्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्यानंतर साहजिकच लोकल ट्रेनमधील गर्दी वाढली. मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का या प्रश्नावर पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेकडून कोरोना रोखण्यासाठी सर्व उपाय योजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. आम्ही पुन्हा एकदा ट्रेन सॅनिटाइज करायला सुरुवात केली आहे. प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी ३०० तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. आताच्या घडीला पश्चिम रेल्वेवर दिवसाला १३०० फेऱ्या चालवल्या जात आहेत. राज्य सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन केले जात असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

संयुक्तरित्या जनजागृती

प्रवाशांनी मास्क घालावा, यासाठी रेल्वे आणि महापालिकेकडून संयुक्तरित्या जगजागृती आणि कारवाई सुरू आहे. तसेच रेल्वेने अवैधपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळ दोन शिफ्ट्समध्ये कशा रीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या.

Web Title: railway clarify on will the local train in mumbai to be closed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.