पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून केली पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमधील सिस्टरशी "मन की बात"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:54 AM2020-03-28T00:54:21+5:302020-03-28T00:55:12+5:30

हॅलो..पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आप से बात करना चाहते है... आणि सुरु झाला संवाद... 

Prime minister Narendra Modi call to naydu hospital nurse chaya of pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून केली पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमधील सिस्टरशी "मन की बात"

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून केली पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमधील सिस्टरशी "मन की बात"

Next
ठळक मुद्देनायडू हॉस्पिटलमधील एका पारिचारिकेशी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद

पुणे : रात्री आठ वाजताची वेळ..  स्थळ पुण्यातील नायडू हॉस्पिटल... फोनची रिंग वाजते पलिकडून आवाज येतो...मै पंतप्रधान कार्यालयसे बात कर रही हूँ . पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आप से बात करना चाहते है... आणि सुरु झाला संवाद... 

मोदी -नमस्ते, सिस्टर छाया, कशा आहात.? तुम्ही स्वतःची काळजी नीट घेत आहात ना. तुम्ही सध्या जीव तोडून काम करत आहात. कुटुंबाला काळजी वाटत असेल. त्यांना तुमच्या या सेवाभावी वृत्तीबद्दल कशा आश्वस्त करता...

पुण्यातील नायडू हॉस्पिटल गेल्या १५ ते २० दिवसांपासून चर्चेत आलं. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातला कोरोनाचा रुग्ण पहिल्यांदा पुण्यात सापडला .. दुबईहून ट्रिप करून आलेल्या एका जोडप्याला त्याची लागण झाल्याचे ९ मार्चला स्पष्ट झाले..आणि त्यानंतर त्यांची रवानगी झाली नायडू रुग्णालयात.. त्यावेळी कोरोनाने तोपर्यंत चीन , जर्मनी, अमेरिका, इटली, युरोप खंडातील देशांमध्ये मृत्यूचे थैमान घातले होते. त्यावर कुठलीही लस न आल्याने त्याच्या समोर सगळे हतबल होते. पण या महाभयंकर परिस्थितीत रुग्णांना धीर देण्यापासून ते त्यांचा आहार, पथ्यपाणी, वेळेवर औषधे देण्यापर्यंत सर्व काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनंतर जर कोण होत्या तर त्या रुग्णालयातील पारिचारिका (नर्स..) तिथल्या पेशंटला सांभाळताना एकीकडे स्वतःला जपत कुटुंबाला सावरणे म्हणजे खूप धैर्याचं काम . परंतु, आपल्या कर्तव्याला जागत  अहोरात्र मेहनत घेऊन जेव्हा पहिल्या कोरोना बाधित रुग्णाला ठणठणीत बरे करून डिस्चार्ज दिल्यावर  केलेल्या मेहनतीचे सार्थक झाल्यानंतरचा आनंद आज पुन्हा द्विगुणित झाला असेल कारण.. आज या नायडू हॉस्पिटलमधील एका पारिचारिकेशी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला... 

पारिचारिका - त्यांना चिंता तर वाटतेच, पण काम तर करावेच लागते. 

मोदी - पेशंट आल्यानंतर खूप घाबरलेले असतील ना

- : हो घाबरलेले असतात. पण आम्ही त्यांच्याशी बोलतो. घाबरू नका. काही होणार नाही. रिपोर्ट चांगला येईल. पोसिटीव्ह आला तरी काही घाबरण्याचे कारण नाही. या रुग्णालयातील सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आणि येथील नऊ पेशंटही चांगले आहेत. त्यांना औषधे देतो. सेवा करतो. थोडी भीती असते पण आम्ही बोलल्यानंतर त्यांना बरे वाटते. 

मोदी - रुग्णांचे कुटुंब नाराजी व्यक्त करत असेल ना?

- : नाही, त्यांना आत येऊ देत नाही. त्यांच्याशी बोलणे होत नाही.

मोदी - देशभरातील सिस्टर ला काय संदेश द्याल.

- : घाबरू नका। काम करा. कोरोनाला हरवून देशाला विजयी करायचेय. हेच ब्रीद वाक्य असेल.

मोदी - सिस्टर.. तुम्हाला खूप शुभेच्छा. असेच काम करत रहा. देशातील लाखो सिस्टर, डॉक्टर, कर्मचारी एका तपस्वी प्रमाणे काम करत आहेत. सगळ्यांकडूनच मला काम करण्याची ताकद मिळत आहे. तुमच्या सगळ्याचे धन्यवाद.r 

- तुम्ही एका छोट्यातल्या छोट्या हॉस्पिटलला फोन करून आमची तसेच रुग्णांची आस्थेने विचारपूस केली..आम्ही घेतलेल्या मेहनतीची तुम्ही घेतलेली दाखल समाधान देणारी आहे. 

Web Title: Prime minister Narendra Modi call to naydu hospital nurse chaya of pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.