पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण?; दोन व्यक्तींमधील संभाषणाची क्लिप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 02:56 AM2021-02-12T02:56:10+5:302021-02-12T07:16:27+5:30

Pooja Chavan suicide case might take different turn: ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असेदेखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असादेखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे.

Pooja Chavan suicide case might take different turn | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण?; दोन व्यक्तींमधील संभाषणाची क्लिप व्हायरल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण?; दोन व्यक्तींमधील संभाषणाची क्लिप व्हायरल

googlenewsNext

पुणे : परळी येथील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्य करण्यावरून दोन व्यक्तींतील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

या ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असेदेखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असादेखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कथित मंत्री व त्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे संभाषण झाले. त्या वेळी तो कार्यकर्ता त्या युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच होता आणि त्या कथित मंत्र्याने सदर युवतीचा मोबाइल ताब्यात घेण्याचा आदेशही दिल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होते.

पूजा लहू चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली होती.

Web Title: Pooja Chavan suicide case might take different turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.