'ऑनलाइन औषध विक्रीचा कायदा अंतिम टप्प्यात'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:52 AM2020-02-27T03:52:57+5:302020-02-27T03:53:06+5:30

डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती; आवश्यकता भासल्यास स्वतंत्र कायदा करू

online medicine selling act is in last phase | 'ऑनलाइन औषध विक्रीचा कायदा अंतिम टप्प्यात'

'ऑनलाइन औषध विक्रीचा कायदा अंतिम टप्प्यात'

Next

मुंबई : ऑनलाइन औषध विक्री संदर्भात केंद्र शासनाचा कायदा अंतिम टप्प्यात असून त्यात आवश्यकता वाटल्यास बदल करुन महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य संग्राम थोपटे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ. शिंगणे म्हणाले, औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन करुन आॅनलाईन औषधे विक्री करण्यास बंदी आहे. राज्यामध्ये गेल्या पाच वर्षात ६६ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून २९ परवाने रद्द करण्यात आले. गर्भपाताची, गुंगीसाठीच्या औषधांची विक्री आॅनलाइन होऊ नये, महाराष्ट्राचे मत असल्याचे केंद्र शासनाला प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यासाठी सुचविले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य पृथ्वीराज चव्हाण, अमीन पटेलसह अन्य आमदारांनी भाग घेतला.

Web Title: online medicine selling act is in last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.