Maharashtra CM : आता कळले अजित पवार रात्री कोणत्या वकिलाकडे बसले होते; संजय राऊत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 09:49 AM2019-11-23T09:49:21+5:302019-11-23T11:38:00+5:30

अजित पवार यांनी आज भाजपा सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Now we came to know about Ajit Pawar was sitting at night which lawyer; Sanjay Raut criticizes | Maharashtra CM : आता कळले अजित पवार रात्री कोणत्या वकिलाकडे बसले होते; संजय राऊत यांची टीका

Maharashtra CM : आता कळले अजित पवार रात्री कोणत्या वकिलाकडे बसले होते; संजय राऊत यांची टीका

googlenewsNext

मुंबई : अजित पवार काल रात्री 9 वाजेपर्यंत आमच्यासोबत होते. पण ते संपूर्ण बैठकीत आमच्या नजरेला नजर भिडवून बोलत नव्हते. त्यांची बॉडी लँग्वेज आमच्या लक्षात आली. शरद पवारांच्याही लक्षात आले. ते बैठकीतून बाहेर पडले, फोन स्वीच ऑफ लागत होता. ते वकिलाकडे बसल्याचे सांगण्यात आले होते. आता सकाळी कळाले ते कोणत्या वकीलाकडे बसले होते, अशी टीका शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 


अजित पवार यांनी आज भाजपा सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शरद पवारांचा काहीही हात नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. जेव्हा शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हाच मला कळले होते. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम केले आहे. महाराजांच्या नावाला काळीमा फासला आहे. राज्यातील जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज भेटणार आहेत. त्यांच्यात सकाळपासून दोनवेळा फोनवर चर्चा झाली आहे. राजभवनात पाप करण्यात आले. रात्रीच्या अंधारात तुम्ही डाका घातलाय. चोरी केलीय़. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांनी ह्या वयात शरद पवारांना दगा देण्याचा प्रयत्न केला ही महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. काहीतरी चांगले घडत असताना हे सर्व सत्ता, पैशाचा गैरवापर करून करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहेच, पण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार हे आयुष्यभर तडफडत राहतील, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. 


शरद पवार अनभिज्ञ? 
शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये; पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.


काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे. 

Web Title: Now we came to know about Ajit Pawar was sitting at night which lawyer; Sanjay Raut criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.