"...तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:42 PM2019-12-02T17:42:34+5:302019-12-02T17:42:51+5:30

हेगडेंचा हा दावा देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावला आहे.

no money was sent back central government ananth kumar hegdes claim- Nawab Malik | "...तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल"

"...तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल"

Next

मुंबईः केंद्राकडून आलेला निधी परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना औटघटकेचं मुख्यमंत्रिपद देण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंनी म्हटलं आहे. त्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे 80 तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडेंनी केला. परंतु हेगडेंचा हा दावा देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावला आहे. केंद्राला एकही पैसा परत देण्यात आलेला नसून सरकारच्या अर्थ विभागानं सत्य समोर आणावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या या निर्णयावर टीका केली आहे.

निधी पुन्हा केंद्राकडे गेला असल्यास या प्रकरणाची पुन्हा चौकशी होईल, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्री आनंद हेगडे सांगत आहेत, 40 हजार कोटी रुपये परत पाठवण्यासाठी देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. बुंद से गई तो हौदसे नही आती, कुठे तरी भाजपा उघडा पडल्यानंतर झाकण्यासाठी असं बोललं जातंय. 40 हजार कोटी आल्यानंतर परत पाठवणे शक्य नाही. जर पाठवले असतील तर पंतप्रधान पायउतार झाल्याशिवाय राहणार नाहीत. पंतप्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल. महाराष्ट्र आणि राज्यांवर हा अन्याय आहे, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

'बुलेट ट्रेन असो वा इतर कोणता प्रकल्प, केंद्र सरकारनं राज्याकडे पैसा मागितलेला नाही. त्यामुळे राज्यानंदेखील केंद्राला पैसा दिलेला नाही. फडणवीस 40 हजार कोटी रुपये केंद्राला परत करण्यासाठी मुख्यमंत्री झाले, हे अतिशय चुकीचं विधान आहे. बुलेट ट्रेनच नव्हे, तर इतर कोणत्याही प्रकल्पातला पैसा राज्य सरकारनं केंद्राला परत पाठवलेला नाही. मुख्यमंत्री किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मी असा कोणताही निर्णय घेतला नाही. ज्याला सरकारची आर्थिक निर्णय प्रक्रिया समजते, त्याला ही गोष्ट समजू शकते. अशा प्रकारे पैसा देता-घेता येत नाही', असं माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या अर्थ विभागानं सत्य समोर आणावं, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. 

काय म्हणाले होते हेगडे?
आमचा माणूस महाराष्ट्रात 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाल्याचं तुम्हाला माहीत असेल. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी 80 तासांत राजीनामा दिला. त्यांनी हे सगळं नाट्य का घडवून आणलं? बहुमत नसतानादेखील ते का मुख्यमंत्री झाले? त्यांनी असा निर्णय का घेतला? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत,' असं हेगडे म्हणाले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या 80 तासांच्या मुख्यमंत्रिपदामागचं राजकारण आणि अर्थकारण सांगितलं. 'काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास केंद्राकडून देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर होईल याची फडणवीसांना कल्पना होती. त्यामुळेच संपूर्ण नाट्य रचण्यात आलं आणि मुख्यमंत्री होताच 15 तासांमध्ये फडणवीसांनी 40 हजार कोटींचा निधी केंद्राकडे परत पाठवला,' असं हेगडे यांनी सांगितलं. 

Web Title: no money was sent back central government ananth kumar hegdes claim- Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.