सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गडकरींना आली भोवळ; राष्ट्रगीत सुरु असताना घडला प्रकार

By Appasaheb.patil | Published: August 1, 2019 01:10 PM2019-08-01T13:10:41+5:302019-08-01T14:09:31+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रगीत सुरू असताना आली भोवळ

Nitin Gadkari was shocked at the program in Solapur | सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गडकरींना आली भोवळ; राष्ट्रगीत सुरु असताना घडला प्रकार

सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गडकरींना आली भोवळ; राष्ट्रगीत सुरु असताना घडला प्रकार

googlenewsNext
ठळक मुद्दे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापूर दौºयावर- सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमास उपस्थिती- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकयात्री पुस्तकाचे गडकरींच्या हस्ते प्रकाशन

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली़ राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली मात्र ते राष्ट्रगीत संपेपर्यंत तसेच उभे राहिले़ राष्ट्रगीत संपल्यानंतर त्यांना पेय देण्यात आले.

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमासाठी केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोलापुरात आले होते. सकाळी बाराच्या सुमारास त्याचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले़ आगमनानंतर भाजप पदाधिकाºयांचा सत्कार स्वीकारून ते सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमास्थळी पोहोचले़ कार्यक्रमावेळी सुरू असलेल्या राष्ट्रगीतावेळी त्यांना भोवळ आली.

 राष्ट्रगीत सुरू असताना ते तसेच उभे राहिले राष्ट्रगीत संपल्यानंतर ते खुर्चीवर खाली बसले त्यानंतर त्यांना पेय देण्यात आले. 

गडकरी यांना भोवळ आल्यानंतर त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ़ मृणालिनी फडणवीस याच्या निवासस्थानी विश्रांती घेतली.  विश्रांतीनंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख याच्या ‘लोकयात्री सुभाष देशमुख’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमास हजेरी लावणार होते, मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी पुढील दौरा रद्द केल्याची माहिती निरूपणकार विवेक घळसासी यांनी लोकमत शी बोलताना दिली.




 

Web Title: Nitin Gadkari was shocked at the program in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.