Nitesh Rane : "आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय", नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 11:37 AM2021-11-10T11:37:32+5:302021-11-10T11:38:25+5:30

Nitesh Rane : बाळासाहेब ठाकरेंनी ९३ च्या दंगलीत हिंदूंना वाचवले. आता उद्धव ठाकरे हे ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केला आहे.

Nitesh Rane targets Chief Minister Uddhav Thackeray on underworld connection of Nawab Malik | Nitesh Rane : "आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय", नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Nitesh Rane : "आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय", नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Next

मुंबई : राज्यात आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

बाळासाहेब ठाकरेंनी ९३ च्या दंगलीत हिंदूंना वाचवले. आता उद्धव ठाकरे हे ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. यात " ९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं... आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय...खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर  गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो...", असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर आज सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत सांगितले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले. तसेच, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास देवेंद्र फडणवीस भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी २००८ मध्ये नोकरीवर येतो आणि १४ वर्षांत मुंबईबाहेर जात नाही, यामागील  कारण काय..? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. 

नवाब मलिकांचे अंडर्वल्डशी संबंध, देवेंद्र फडणवीसांचा दावा 
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांशी संबंध असल्याचा घणाघात केला. नवाब मलिक यांच्या मुलाचे थेट संबंध दाऊद इब्राहिमसोबत असल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

Web Title: Nitesh Rane targets Chief Minister Uddhav Thackeray on underworld connection of Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.