"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 03:00 PM2020-09-08T15:00:47+5:302020-09-08T15:03:47+5:30

केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

ncp rohit pawar slams modi government over kangana y level security | "मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

Next

मुंबई - शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं कंगना शिवसेनेच्या निशाण्यावर आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगना राणौतला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाला शिवसेनेकडून थेट इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर कंगनानंदेखील शिवसेनेला प्रतिआव्हान दिलं आहे. 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय. हिंमत असेल तर अडवून दाखवा, अशा शब्दांत कंगनानं आव्हान दिल्यानं वातावरण तापलंय. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे एक ट्विट केलं आहे. "कोरोना, बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत राहा, आम्ही तुला सुरक्षा पुरवू', अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येतेय. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा" असं ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

कंगनाने मानले केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आभार 

संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचं कंगनानं म्हटलं होतं. त्यानंतर कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान शिवसेनेला दिलं. त्यामुळे आता केंद्रानं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर कंगनानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. 'सध्याच्या परिस्थिती पाहता काही दिवस मुंबईला जाऊ नको, असा सल्ला अमित शहाजी देऊ शकले असते. मात्र त्यांनी भारताच्या एका कन्येला दिलेल्या शब्दाचा मान राखला. आमच्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लाज राखली. जय हिंद!,' अशा शब्दांत कंगनानं शहांचे आभार मानले.

कंगनाला संरक्षण देण्याचा हिमाचल प्रदेश सरकारचा निर्णय 

हिमाचल प्रदेश सरकारनं कंगनाला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याबद्दलची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली आहे. याबद्दलच्या सूचना राज्याच्या डीजीपींना दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं. कंगनानं काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेश सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. कंगनाला सुरक्षा पुरवण्यासाठी तिच्या वडिलांनी डीजीपींनी पत्र लिहिल्याची माहिती ठाकूर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. 'कंगनाच्या बहिणीनं काल मला फोन केला होता. तिला ९ सप्टेंबरला मुंबईला जायचं आहे. कंगनाला मुंबई दौऱ्यात सुरक्षा देण्याचा विचार सुरू आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशची कन्या आहे. त्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे,' असं ठाकूर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू

CoronaVirus News : ...म्हणून देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय

नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा

Web Title: ncp rohit pawar slams modi government over kangana y level security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.