ड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची आता स्वतःहून चौकशी करावी - सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 08:19 PM2020-09-07T20:19:21+5:302020-09-07T20:23:42+5:30

कंगना रानौत सारख्या व्यक्तीची तुलना भाजपाचे 'झांसे के राजा' आमदार राम कदम यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी केली.

NCB should now probe Kangana on its own in drug case - Sachin Sawant | ड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची आता स्वतःहून चौकशी करावी - सचिन सावंत

ड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची आता स्वतःहून चौकशी करावी - सचिन सावंत

Next
ठळक मुद्देकंगनाच्या विधानाशी सहमत नसल्याची सारवासारव भाजपाने केली पण त्यांनी तिच्या विधानाचा साधा निषेधही केलेला नाही, असे सचिन सावंत म्हणाले.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने स्वतःच ड्रग घेत असल्याची एका व्हिडिओमध्ये कबुली दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती, अशी विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगनाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

कंगना रानौत सारख्या व्यक्तीची तुलना भाजपाचे 'झांसे के राजा' आमदार राम कदम यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी केली. इतिहासात झाशीच्या राणीचा एवढा मोठा घोर अपमान करण्याची कोणी हिंमत दाखवली नाही. त्याबद्दल भाजपाने देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. कंगनाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाईही केलेली नाही. ते विधान राम कदम यांचे वैयक्तीक आहे, असे म्हणून जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. तसेच कंगनाच्या विधानाशी सहमत नसल्याची सारवासारव भाजपाने केली पण त्यांनी तिच्या विधानाचा साधा निषेधही केलेला नाही, असे सचिन सावंत म्हणाले.

याचबरोबर, मुंबई व महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या, मुंबई पोलीसांना माफीया म्हणणाऱ्या कंगनाला केंद्रातील मोदी सरकारने तत्काळ वाय दर्जाची सुरक्षा दिली, यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. भाजपा नेहमीच त्यांच्या हिताचा अजेंडा चालवणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देते. देशात भाजपाच्या संरक्षणात विवाद उत्पन्न करणारे व विरोधी पक्षाच्या सरकारांची बदनामी करणारे अनेकजण नियुक्त केले आहेत. कंगनाचे बोलवते धनी भाजपा नेते आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे. मुंबईचा व महाराष्ट्राचा कंगनाने केलेला अपमान भाजपाच्या इशाऱ्यावर होता, असेही सचिन सावंत म्हणाले.

आणखी बातम्या...

"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"    

- दाऊदचा हस्तक बोलतोय, उद्धव ठाकरेंशी बोलायचंय; 'मातोश्री'वर दुबईहून फोन    

- दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर    

- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप    

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना    

- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स    

- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला     

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

Web Title: NCB should now probe Kangana on its own in drug case - Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.