nawab malik react on corona situation lockdown in the state | “पुढे काय परिस्थिती असेल, आता सांगता येत नाही, आढावा घेऊन निर्णय घेणार”

“पुढे काय परिस्थिती असेल, आता सांगता येत नाही, आढावा घेऊन निर्णय घेणार”

ठळक मुद्देनवाब मलिक यांची कोरोना परिस्थितीवर प्रतिक्रियाएकंदर स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार - मलिकपुढे काय होईल, हे आताच सांगता येणार नाही - मलिक

मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यभरात कोरोनाचा उद्रेक होत असून, आता कठोर लॉकडाऊन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेड, ऑक्सिजन, औषधांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. एकंदर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (nawab malik react on corona situation lockdown in the state)

नवाब मलिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील करोना परिस्थिती आणि राज्य सरकारकडून टाकल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा संक्रमण वेग प्रचंड असल्याने अवघ्या महिनाभरातच आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्य सरकार लॉकडाऊनच्या तयारीत आहे, असे सांगितले जात आहे. 

आढावा घेऊन निर्णय घेणार

पुढे काय परिस्थिती निर्माण होईल, हे आताच सांगता येणार नाही, पण महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची व्यवस्था आयसीयू बेड्स यांची व्यवस्था करण्यासंदर्भातील अधिकार सर्वच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. 

तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी; जयंत पाटलांना सदाभाऊंचा टोला

मुंबईत कोविड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणखी क्षमता वाढवण्याचे काम राज्यात सुरू आहे. मुंबईत कोव्हिड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. त्यात आता दोन नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. तसेच कोव्हिड सेंटरमध्येही नोडल अधिकारी असणार आहे. आताच्या घडीला नियम तयार करण्यात आलेले आहेत, ते लागू आहेत. सरकार व सरकारमधील सर्व मंत्री एकत्रितपणे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतील, असे नवाब मलिक म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत व्यक्त केले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nawab malik react on corona situation lockdown in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.